KTM has launched GP editions of two bikes | Loksatta

भारतीय बाजारपेठेत KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन; काय आहे खास जाणून घ्या…

लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक निर्माती कंपनी केटीएमने आपल्या दोन बाईक्सची मोटो जीपी एडिशन भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत.

भारतीय बाजारपेठेत KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन; काय आहे खास जाणून घ्या…
Pic Credit-jansatta

बाईक रेस मधली सर्वात लोकप्रिय बाईक रेस म्हणजे मोटो जीपी ज्याची झलक आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे. या कारणामुळे दुचाकी कंपनी त्यांच्या मोटो जीपी बाईक सतत लाँच करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक निर्माती कंपनी केटीएमने आपल्या दोन बाईक्सची मोटो जीपी एडिशन लाँच केले आहेत. या सुपर स्पोर्ट्स बाईक मध्ये RC 390 आणि RC 200 यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या बाईक्सची खास वैशिष्ट्ये.

इंजिन

KTM RC 200 ला १९९ सीसी लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन २५.४ एचपीची कमाल पॉवर आणि १९.५ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. तर केटीएम आरसी ३९० मध्ये ३७३ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन ४३ hp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि ३७ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईकमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे.

आणखी वाचा : ‘या’ दोन हिरो मोटरसायकल अतिशय कमी किंमतीत उपलब्ध; खरेदी करण्याची संधी, कोणती असेल सर्वोत्तम जाणून घ्या!

लुक

केटीएमच्या या दोन्ही बाईक सिग्नेचर ऑरेंज रंगामध्ये आहेत. तसेच, त्यावरील काळ्या रंगाचे स्टिकर्स बाइकला आणखीन आकर्षक बनवत आहे. बाकी गोष्टींमध्ये या बाईक सारख्या आहेत.

किंमत

केटीएमच्या नवीन RC 390 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत ३,१६,०७० रुपये आहे. तर RC 200 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत २,१४,६८८ रुपये आहे. या दोन्ही बाइक्सचा लुक अतिशय आकर्षक असून बाइक्स प्रेमींना या अधिक आकर्षित करतील.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हिरोने व्हिडिओत दाखवलेली आकृती Vida scooter तर नाही ना? पाहा टिझर

संबंधित बातम्या

२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
Electric Scooter Fire: इलेक्ट्रिक स्कुटर्सना आग का लागतेय? केंद्रीय समितीने सांगितलं कारण
प्रतीक्षा संपली! Jeep Grand Cherokee नोव्हेंबर २०२२ ला भारतात लाँच होणार; टीझर रिलीज
Petrol-Diesel Price on 20 November 2022: पेट्रोल-डिझेलचे दरामध्ये घट; जाणून घ्या आजची नवी किंमत
Car Tips: थंडीच्या दिवसांत कारमध्ये हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर ‘या’ चुका करु नका; अन्यथा हलगर्जीपणा पडेल महागात…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान
मुंबई : पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
IND vs BAN 2nd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई : मलिक खरोखर गंभीर आजाराने त्रस्त ?, जामीन नाकारताना विशेष न्यायालयाचा प्रश्न
भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”