लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी Lamborghini भारतामध्ये आपले नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीने हे मॉडेल सप्टेंबर २०२२ मध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केले होते. Lamborghini भारतामध्ये आपली नवीन Urus S लॉन्च करणार आहे. नवीन Urus S ची किंमत Urus Performante पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या नवीन मॉडेलबद्दल अधिक जाणून घेऊयात.
Lamborghini Urus S हे मॉडेल Urus Performante पेक्षा थोडे वेगळे असणार आहे. या दोन्ही मॉडेलचे रचना आणि डिझाईन सारखेच आहे. Urus S ला कूलिंग व्हेंट्ससह सिंगल-टोन बोनेट मिळते. तर Urus Performante ला ड्युअल-टोन बोनेट मिळते. कंपनीने Urus S च्या पुढील आणि मागील बंपरच्या डिझाइनमध्येही काही बदल केले आहेत. तर या मॉडेलच इंटेरिअर हे आधीच्या मॉडेलसारखेच असणार आहे.
हेही वाचा : Maruti Suzuki Nexa कडून २० लाखांपेक्षा अधिक वाहनांची विक्री; ‘या’ गाड्यांना सर्वाधिक पसंती
कसे असणार इंजिन ?
Lamborghini Urus S ला Performante सारखेच इंजिन मिळणार आहे. यामध्ये Porsche Cayenne Turbo चे ४.० लिटरचे, V8 ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन ६६६एचपी पॉवर जनरेट करते. तसेच हे इंजिन ८-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी कनेक्ट करण्यात आले आहे. Urus S फक्त ३.५ सेकंदात ०-१०० kph स्पीड पकडू शकते. सस्पेंशन हे दोन्ही मॉडेलमध्ये असणारा सर्वात मोठा फरक आहे. Performante या मॉडेलमध्ये कमी फिक्स्ड कॉइल स्प्रिंग्स सस्पेंशन मिळते, तर आराम-केंद्रित Urus S ला पूर्वीप्रमाणे एअर सस्पेंशन मिळणार आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये कंपनीने भारतात Urus S बद्दल २०० व्या युनिट्सचे वितरण केले होते. २०२२ मध्ये कंपनीने ३३ टक्के वार्षिक वाढीसह ९२ युनिट्सची विक्री केली होती. कंपनी देशामध्ये Urus S सह सात व्हेरिएंटचे मॉडेलची विक्री करते. Lamborghini Urus S या कारची स्पर्धा Oddi Q8 सही असणार आहे. ज्यामध्ये ३.0L छे पेट्रोल इंजिन वापरायला मिळते. भारतामध्ये ही कार दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्याची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ही १.०६ कोटी रुपये इतकी आहे.
हेही वाचा : BMW Motorrad: भारतात लॉन्च झाली R 18 Transcontinental बाईक, SUV सारखे पॉवरफुल इंजिन आणि…
कधी होणार लॉन्च आणि काय असणार किंमत ?
Lamborghini आपले नवीन मॉडेल Urus S भारतामध्ये लॉन्च करणार आहे. कंपनी हे मॉडेल १३ एप्रिल रोजी भारतामध्ये लोणचं करणार असून याची (एक्सशोरूम) किंमत ४.२२ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.