लँड रोव्हरने भारतात आपल्या नवीन रेंज रोव्हर वाहनाची बुकिंग सुरू केली आहे. रेंज रोव्‍हर ही मूळ लग्‍झरी एसयूव्‍ही आहे आणि ५० वर्षांपासून अग्रस्‍थानी आहे. या कारमध्‍ये अतुलनीय आरामदायी सुविधेसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍याची क्षमता आहे. नवीन रेंज रोव्‍हर मध्‍ये उल्‍लेखनीय आधुनिकता व आकर्षकतेसह अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटी आहे.आकर्षक नवीन रेंज रोव्‍हर आधुनिक लग्‍झरीला परिभाषित करत अधिक सुधारणा, ग्राहकांना निवड करण्‍याची सुविधा आणि अभूतपूर्व वैयक्तिक बदल करण्‍याची सुविधा देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कशी आहे ही कार?

कंपनीने नवीन रेंज रोव्हर वाहन तीन इंजिन पर्यायांमध्ये सादर केली आहे जे तीन-लिटर डिझेल, तीन-लिटर पेट्रोल आणि ४.४ लिटर पेट्रोल असे आहेत. सहा सिलिंडरचे पेट्रोल आणि डिझेल इंजिन हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. सहा-सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये नवीनतम ४८V माईल्ड हायब्रीड (MHEV) तंत्रज्ञान आहे जे सामान्यत: कमी गती आणि ब्रेकिंगमध्ये कमी होणारी ऊर्जा वापरून इंधन कार्यक्षमता वाढवते.

(हे ही वाचा: KIA च्या नवीन कार ‘Carens’ MPV चे बुकिंग ‘या’ तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या फीचर्स)

फोटो : PR

(हे ही वाचा: Tiago ते Harrier पर्यंत, टाटा मोटर्स ‘या’ गाड्यांवर देत आहेत बंपर सूट; जाणून घ्या तपशील)

भारतातील लक्झरी वाहनांमध्ये अग्रेसर

रोहित सुरी, जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, “रेंज रोव्हर हे भारतातील लक्झरी वाहनांमध्ये आघाडीवर आहे आणि त्याची नवीन आवृत्ती ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मदत करेल. या वाहनाची इंटिग्रेटेड स्टार्टर मोटर स्टॉप-स्टार्ट सिस्टमचे सुरळीत ऑपरेशन सुनिश्चित करते आणि इंजिनला अतिरिक्त समर्थन प्रदान करते.

(हे ही वाचा: अवघ्या ४ लाखांच्या बजेटमध्ये उत्तम बजेट देणाऱ्या ‘या’ आहेत टॉप ३ कार!)

कंपनीने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात या नवीन वाहनाची शोरूम किंमत २.३१ कोटी रुपयांपासून सुरू होईल. यासाठी बुकिंग सुरू झाले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land rover most luxurious suv range rover launched in india know the features price ttg
First published on: 13-01-2022 at 18:08 IST