Tata Motors Next generation trucks: भारतीय ट्रकिंग उद्योगात मोठा बदल घडवून आणत Tata Motors ने एकूण १७ नेक्स्ट-जनरेशन ट्रक्सचा भव्य पोर्टफोलिओ अधिकृतपणे सादर केला. ७ टन ते ५५ टन क्षमतेतील या ट्रक्समुळे सुरक्षितता, नफाक्षमता आणि कार्यक्षमतेत नवी मानके प्रस्थापित होणार आहेत. या लाँचमध्ये ऑल-न्यू अझुरा सिरीज, अत्याधुनिक Tata Trucks.ev इलेक्ट्रिक ट्रक्सची श्रेणी तसेच प्राइमा, सिग्ना आणि अल्ट्रा प्लॅटफॉर्म्समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे.

टाटा मोटर्सचे एमडी आणि सीईओ गिरीश वाघ म्हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्र वेगाने बदलत आहे. आमचा नेक्स्ट-जनरेशन पोर्टफोलिओ अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्ससाठी तयार करण्यात आला आहे. अझुरा सिरीज, नवीन I-Moev आर्किटेक्चरवरील इलेक्ट्रिक ट्रक्स, सुधारित युरोपियन केबिन्स, जास्त पेलोड क्षमता आणि उत्तम इंधन कार्यक्षमता यामुळे ग्राहकांच्या नफ्यात थेट वाढ होईल. हे ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”

अझुरा सिरीज: ILMCV विभागासाठी नवी ओळख

टाटा मोटर्सने अझुरा ही ऑल-न्यू श्रेणी सादर केली असून ती इंटरमिजिएट आणि लाइट कमर्शियल व्हेईकल (ILMCV) विभागासाठी डिझाइन करण्यात आली आहे. आरामदायी केबिन, उच्च अपटाइम आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेमुळे अझुरा चालकांचा थकवा कमी करते.

दर्जात्‍मक कामगिरी व कार्यक्षमता देणा-या नवीन ३.६-लिटर डिझेल इंजिनची शक्‍ती असलेला अझुरा विश्वसनीयता व अपटाइमसाठी नवीन मापदंड स्‍थापित करतो. अझुरा श्रेणी ७ टन ते १९-टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये सादर करण्‍यात येईल, जी ई-कॉमर्स व एफएमसीजी वितरणापासून व्‍हाइट गुड्स डिलिव्‍हरी, बांधकाम साहित्‍याची वाहतूक, कृषी व औद्योगिक सामानांची वाहतूक, तसेच इंटरसिटी, मध्‍यम अंतराच्या व प्रादेशिक लॉजिस्टिक्‍सपर्यंत विविध उपयोजनांसाठी अनुकूल आहे.

भारतातील रस्‍त्‍यावर जागतिक दर्जाची सुरक्षितता आणली

टाटा मोटर्सने रस्‍ता सुरक्षिततेसाठी नवीन मापदंड स्‍थापित केले आहे, जेथे ECE R29 03 जागतिक क्रॅश सेफ्टी मानकांची (युरो क्रॅश नॉर्म्‍स) पूर्तता करण्‍यासाठी आपल्‍या संपूर्ण ट्रक पोर्टफोलिओसह सिग्‍ना, प्राइमा, अल्‍ट्रा आणि ऑल-न्‍यू अझुरा श्रेणीमध्‍ये सर्वसमावेशक अपग्रेड केले आहे. या ट्रक्‍समध्‍ये संपूर्ण पुढील बाजूस, रोलओव्‍हर व साइड-इम्‍पॅक्‍टपासून संरक्षणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या केबिन्‍स आहेत, तसेच जवळपास भारतातील रस्‍त्‍यांना अनुसरून २३ पर्यंत प्रगत सक्रिय सुरक्षितता तंत्रज्ञान आहेत, जसे अॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि कोलिजन मिटीगेशन सिस्‍टम्‍स. नेक्‍स्‍ट-जनरेशन कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग वर्तणूकीवर रिअल-टाइम देखरेख सुरक्षिततेमध्‍ये अधिक वाढ करते, ज्‍यामुळे टाटा मोटर्स या प्रख्‍यात आंतरराष्‍ट्रीय मानकांची पूर्तता करणा-या आपल्‍या ट्रक्‍समध्‍ये अधिक सुधारणा करणारी भारतातील एकमेव उत्‍पादक कंपनी ठरली आहे.

उद्योगातील सर्वोत्तम पेलोड, इंधन कार्यक्षमता आणि फ्लीट व्‍यवस्‍थापनासह नफ्यामध्‍ये वाढ

कमाईची क्षमता वाढवण्यासाठी आणि मालकीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेले, टाटा मोटर्सच्या ट्रक श्रेणीमध्ये केलेले अपग्रेड्स मूर्त फायदे देतात, जे थेट नफा वाढवतात. स्मार्ट सुधारणांमुळे पेलोड क्षमता १.८ टनांपर्यंत वाढली आहे, तर प्रगत ६.७-लिटर कमिन्स डिझेल इंजिनच्या नेतृत्वाखालील ड्राइव्हट्रेन अपग्रेडमुळे 7% पर्यंत अधिक इंधन कार्यक्षमता मिळते. एकत्रितपणे, हे नावीन्यपूर्ण बदल वाहतूकदारांना प्रत्येक गुंतवणुकीवर अधिक नफा मिळवण्यासाठी उत्कृष्ट पेलोडचा फायदा, लक्षणीय इंधन बचत आणि मालमत्तेचा इष्टतम वापर करून देतात.

टाटा ट्रक्स.ईव्ही श्रेणी प्रगत ईव्ही आर्किटेक्चर, इंटेलिजेंट बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि स्वदेशी बनावटीचे व उत्पादित महत्त्वाचे घटक वापरून, सखोल स्थानिकीकरणाद्वारे विकसित करण्यात आली आहे. यामुळे ई-ट्रकिंग अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि भारतीय व्यवसायांच्या विविध गरजा व रस्त्यांच्या परिस्थितीनुसार अचूकपणे तयार होते. विविध प्रकारच्या सानुकूलित वित्तपुरवठा पर्यायांची उपलब्धता, वेगाने वाढणारी चार्जिंग इकोसिस्टम आणि देशभरात स्मार्ट, विश्वासार्ह चार्जिंग सोल्यूशन्सची अंमलबजावणी, हे सर्व अखंड आणि कार्यक्षम ई-ट्रकिंग कार्यान्वित करण्यासाठी उत्पादनाच्या विकासाच्या प्रयत्नांना पूरक ठरते.

टाटा मोटर्स अॅडवाण्‍टेज: परिपूर्ण समाधान

जागतिक दर्जाचे ट्रक्‍स व डिजिटल सोल्‍यूशन्‍स व्‍यतिरिक्‍त ग्राहकांना टाटा मोटर्सच्‍या Sampoorna Seva २.० परिसंस्‍था आणि व्यापक सर्विस नेटवर्कमधून फायदा मिळतो, जे २४x७ सपोर्ट, खात्रीदायी पार्ट्सची उपलब्‍धता, कनेक्‍टेड फ्लीट एज सेवा, एएमसीसह ड्राय‍व्‍हर प्रशिक्षण आणि कार्यक्षम ताफा व्‍यवस्‍थापनासाठी सर्वोत्तम फायनान्सिंग सेवा देतात.