scorecardresearch

इग्निट्रॉन मोटोकॉर्पची नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक भारतात लाँच; सिंगल चार्जमध्ये धावते १८० किमी

इग्निट्रॉनने आपल्या या तिसऱ्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकला सायबॉर्ग जीटी १२० (Cyborg GT 120) असे नाव दिले आहे.

Cyborg-GT-120
ही संपूर्णपणे स्वदेशी बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

देशात इलेक्ट्रिक स्कुटर आणि कारची वाढती मागणी पाहता इलेक्ट्रिक वाहनांचे हे क्षेत्र आणखीनच मोठे होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा वाढता कल पाहता, अनेक कंपन्यांसह देशी-विदेशी कंपन्यांनीही त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी भारतात लाँच करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इग्निट्रॉन मोटोकॉर्प (Ignitron MotoCorp) या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे नाव देखील जोडले गेले आहे. या कंपनीने भारतामध्ये तिसरी इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे.

इग्निट्रॉनने आपल्या या तिसऱ्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकला सायबॉर्ग जीटी १२० (Cyborg GT 120) असे नाव दिले आहे. ही संपूर्णपणे स्वदेशी बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बाईकच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल सांगायचे तर, कंपनीने या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक जीटी १२० मध्ये ४.६८kW क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी १५ एएमपी फास्ट चार्जरसह प्रदान केली गेली आहे जी आकार, वजन आणि कोणत्याही हवामानात चांगली रेंज प्रदान करते. तसेच, एकदा पूर्ण चार्ज केल्यावर, ही बाईक ताशी १२५ किमीच्या टॉप स्पीडसह १८० किमीची लांब रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

सामान्य कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करणे शक्य? जाणून घ्या किती येईल खर्च

कंपनीने या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइकमध्ये तीन रायडिंग मोड दिले आहेत, ज्यामध्ये पहिला इको मोड, दुसरा नॉर्मल मोड आणि तिसरा स्पोर्ट्स मोड आहे. बाईकच्या वेगाबाबत कंपनीचा आणखी एक दावा असा आहे की ही बाईक अवघ्या २.५ सेकंदात ० ते ४० किमी/ताशी कमाल वेग गाठू शकते. या इलेक्ट्रिक बाईकला पेट्रोल बाईकचा फील देण्यासाठी कंपनीने यात मल्टिपल साउंड्सची सुविधा दिली आहे.

फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये रिवर्स मोड, पार्किंग असिस्ट यासोबतच हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये अ‍ॅप आणि ब्लूटूथ तसेच जिओ फेसिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, कीलेस इंजिन स्टार्ट स्टॉप आणि डिजिटल क्लस्टर या सुविधांचा समावेश आहे. खडबडीत रस्त्यावर उत्तम राइडिंग अनुभवासाठी, कंपनीने बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला अ‍ॅडजस्टेबल मोनो शॉक सिस्टीम दिली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Launches new electric sports bike in india runs 180 km in single charge pvp

ताज्या बातम्या