भारतात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात लिथियमचा मोठा सापडला असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. रियासी जिल्ह्यातील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी तयार करण्यासाठी होतो. जम्मू काश्मीरमध्ये ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला बळ मिळू शकते व या लिथियमच्या साठ्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती स्वस्त होणार का? याबाबत ही उत्सुकता आहे.

सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची पसंती वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्कूटर बाईक आणि कार्स यांचा समावेश होतो. Auto Expo २०२३ मध्ये अनेक अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च केली आहेत. सध्या भारत लिथियमसाठी चीन, जपान , दक्षिण कोरिया, इंडोनेशिया , अर्जेंटिना या देशांवर अवलंबून राहावे लागते. वास्तविक लिथियम हे कोणत्याही प्रकारची बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा प्रमुख घटक आहे.

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस

हेही वाचा : Odysse E-Scooter: ओडिसीची नवीन ई-स्कूटर वाहणार २५० किलोचे वजन, एकदा चार्ज झाली की धावणार ‘इतके’ अंतर, जाणून घ्या

जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे. लिथियमचे अनेक फायदे आहेत. परंतु याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. गुरुवारी झालेल्या ६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या (CGPB) बैठकीत १५ इतर संसाधन भूवैज्ञानिक अहवाल आणि ३५ भूवैज्ञानिक ज्ञापनांसह हा अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे.

मात्र जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन क्षमतेला अधिक बळ मिळेल. तसेच आता देशातच लिथियम सापडल्यामुळे ते आयात करावे लागणार नाही. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होणार का ? याची उत्सुकता ग्राहकांना नक्कीच असणार आहे.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये सापडला मोठा खजिना, भारत आता अमेरिका-चीनलाही मागे टाकणार?

जाणून घ्या लिथियम म्हणजे नक्की काय ?

लिथियमचा सर्वात महत्त्वपूर्ण वापर विद्युतघटात (बॅटरीत) करण्यात येतो. मोबाइल फोन प्रभारित (चाìजग) करणं म्हणजे दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब झाली आहे. तशा वेगवेगळ्या पण ठराविक मूलद्रव्यांचे विद्युतघट वापरात आहेत त्यापैकीच एक आपण वापरतो ते लिथियम आयन पॉलिमर  विद्युतघट.  मोबाइल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे, विजेवर चालणाऱ्या मोटारी यांमध्ये पुन:पुन्हा प्रभारित करता येणाऱ्या विद्युतघटात लिथियम आयन वापरतात. लिथियमच्या अणूतील एक इलेक्ट्रॉन सहजरीत्या गमावला जाऊन लिथियम आयन तयार होतो.  प्रभाररहित होताना इलेक्ट्रॉन लिथियमच्या विद्युत अपघटनी (आयनयुक्त) संयुगातून धनाग्राकडून (अ‍ॅनोड) ऋणाग्राकडे (कॅथोड) जातात. प्रभारित होताना या उलट प्रक्रिया होते. घडय़ाळे, खेळणी इत्यादी वस्तूंमध्ये बटणासारखे  चपटे विद्युतघट असतात. यात लिथियम धातू वापरलेला असतो आणि ते विद्युतघट पुन्हा प्रभारित करता येत नाहीत.

लिथियमच्या ज्वलनामुळे भडक किरमिजी रंगाची ज्योत निर्माण होत असल्यामुळे शोभेची दारू, तसेच लष्करासाठी लागणारी स्फोटके यांसाठी लिथियमच्या संयुगांचा वापर केला जातो. अणुभट्टीमध्ये अणुसम्मीलन प्रक्रियेत न्युट्रॉन शोषून घेण्यासाठी लिथियम वापरतात. लिथियम धातू क्षरणकारी (corrosive) आणि अतिक्रियाशील असल्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते; म्हणून तो काळजीपूर्वक हाताळतात.