इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्यासाठी एलएमएल कंपनी सज्ज; हार्ली डेविडसनचं उत्पादन करण्याऱ्या कंपनीसोबत भागीदारी

एलएमएल इलेक्ट्रिकने सिएरा इलेक्ट्रिक ऑटोसोबत भागीदारी केली आहे.

lml-electric-scooter-620x400
इलेक्ट्रिक दुचाकी आणण्यासाठी एलएमएल कंपनी सज्ज; हार्ली डेविडसनचं उत्पादन करण्याऱ्या कंपनीसोबत भागीदारी (Photo- Financial Express/ प्रातिनिधीक फोटो)

एलएमएल इलेक्ट्रिकने सिएरा इलेक्ट्रिक ऑटोसोबत भागीदारी केली आहे. सिएरा इलेक्ट्रिक भारतात हार्ली डेविडसनसाठी मोटारसायकलचं उत्पादन करते. एलएमएल सिएराच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यातील उत्पादन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सिएराची स्टेट ऑफ दी आर्ट फॅसिलिटी हरयाणाच्या बावलमध्ये केली आहे. आता एलएमएल इलेक्ट्रिक वाहनं तयार करण्यास सज्ज आहे. सिएराची पायाभूत सुविधा आधुनिक आणि नाविन्यपूर्ण आहे. २०२५ पर्यंत भारतात १०० टक्के उत्पादन करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. हा उत्पादन प्रकल्प २.१८ लाख चौरस फुटांमध्ये उभारला जाणार आहे. तसेच दरमहा १८ हजार वाहनांची निर्मिती केली जाणार आहे.

एलएमएलचे सीईओ डॉ. योगेश भाटिया म्हणाले की, “आम्हाला दुचाकी आणि ऑटो सेगमेंटच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या या महत्त्वपूर्ण भागीदारीबद्दल आनंद होत आहे. सिएरा ही आमची पहिली पसंती आहे कारण ही कंपनी बऱ्याच काळापासून जगातील सर्वात मोठ्या ब्रँडसाठी उत्पादन करत आहे. एलएमएलला या युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत ज्यात १०० टक्के देशांतर्गत उत्पादने तयार केली जातील आणि त्यांची गुणवत्ता निश्चितच उत्कृष्ट असेल.” एलएमएल १९७२ मध्ये सुरू करण्यात आली होती. या स्कूटर्सना १९८० मध्ये चांगली पसंती मिळाली होती. कंपनीने १९८३ पासून वेस्पा एक्सईचं उत्पादन सुरु केलं होतं. त्यानंतर कंपनीने ९० च्या दशकात काही मोटारसायकल लॉन्च केल्या होत्या.

TVS Radeon vs Hero Splendor iSmart: जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

दुसरीकडे एलएमएलने पार्थ चौधरी यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. चौधरी आता डॉ योगेश भाटिया, सीईओ आणि एमडी, एलएमएल यांच्या टीममध्ये सामील झाले आहेत. पार्थने यापूर्वी हिरो लेक्ट्रो (हीरो सायकल्स लिमिटेडचे ​​एक युनिट), यामाहा, २२ किमको आणि निलकमल यांसारख्या संस्थांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. सीओओ या नात्याने, पार्थ मोठ्या व्यावसायिक वाढ आणि परिवर्तनाच्या युगात ऑपरेशन्सचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदार असेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lml tie up with saera auto to manufacturing electric vehicles rmt

Next Story
Petrol- Diesel Price Today: आजचे इंधनाचे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रति लिटरचा भाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी