Electric Scooter Buying Guide: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहाता सर्वच लोक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळले आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांकडे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे बरेच लोक आता इलेक्ट्रिक गाड्या विकत घेत आहे. भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कूटर पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपयांपर्यंत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कूटरबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्ही फक्त ५० हजारापेक्षा कमी किमतीत ही स्कूटर घरी आणू शकता. चला तर जाणून घेऊया कोणती आहे बेस्ट स्कूटर..

Lohia Oma Star Electric Scooter

आज आपण Lohia Oma Star Electric Scooter बद्दल बोलत आहोत. ही स्कूटर तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ४८V, २०Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीमध्ये २५०W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी ६ ते ८ तासांत पूर्ण चार्ज होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

(हे ही वाचा : फक्त 1 लाख भरून घरी आणा तुमची आवडती Tata Punch; महिन्याला भरा ‘इतका’ EMI)

Lohia Oma Star Electric Scooter रेंज

Lohia Oma Star Electric Scooter च्या राइडिंग रेंजबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ६० किलोमीटरची राइडिंग रेंज देते आणि रेंजसोबत २५ किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देखील उपलब्ध आहे.

Lohia Oma Star Electric Scooter ब्रेकिंग सिस्टम

लोहिया ओमा स्टार इलेक्ट्रिक स्कूटरला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक मिळतात. यासोबतच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम दिली आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: मेड इन इंडिया! जगातील पहिला सेल्फ बॅलेन्सिंग टेक्नोलॉजीसोबत येणारा ई-स्कूटर लाँच; व्हिडीओ पाहून म्हणाल… )

Lohia Oma Star Electric Scooter वैशिष्ट्ये

लोहिया ओमा डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, पास स्विच, हॅलोजन हेडलाइट, बल्बसह टेल लाइट, बल्बसह टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर या वैशिष्ट्यांसह येतो.

Lohia Oma Star Electric Scooter किंमत

Lohia Oma Star इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ४१ हजार ४४४ रुपये आहे. ऑन रोड स्कूटरची ही किंमत ४६ हजार ०८२ रुपये होते.