Chirag Paswan Car collection : नरेंद्र मोदी यांनी ८ जून रोजी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह एकूण ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. सध्या या मंत्र्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मोदी सरकारमधील सर्वात कमी वयाचे मंत्री झालेले लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे अध्यक्ष चिराग पासवान सध्या चांगलेच चर्चेत आहे.

आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारे चिराग पासवान यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात चित्रपटाद्वारे केली पण तिथे त्यांना अपयश आले त्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांना यश मिळाले. देशातील एक लोकप्रिय व प्रमुख नेते राम विलास पासवान यांचेे पुत्र व चित्रपटसृष्टीत काम करून सुद्धा चिराग पासवान यांचे राहणीमान अत्यंत साधे आहेत. हे तुम्हाला त्यांचे कार कलेक्शन पाहून सहज समजून येईल. जर तुम्हाला सुद्धा चिराग पासवान हे आवडत असेल तर त्यांचे कार कलेक्शन नक्की पाहा

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Going out with a car in rainy season
पावसाळ्यात कार घेऊन बाहेर पडताय? ‘या’ टिप्स करा फॉलो, प्रवास होईल सुखकर
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा : किंमत ५.५४ लाख, मायलेज ३४.०५ किमी; मारुतीच्या ‘या’ ३ स्वस्त कारला तुफान मागणी, खरेदीसाठी शोरुम्ससमोर लागल्या रांगा

चिराग पासवान यांचे कार कलेक्शन

निवडणुक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, चिराग पासवान यांची एकुण संपत्ती २.६८ कोटी इतकी आहे. यामध्ये ३५ लाखांच्या दोन एसयूव्ही कारांचा समावेश आहे.

मारुती सुजुकी जिप्सी

मारुती सुजुकी जिप्सी ही एक लोकप्रिय कार आहे. भारतात विकली जाणारी सर्वात सक्षम ऑफ रोडर्स कारपैकी एक आहे. साधी, ऑफ रोड क्षमता आणि इलेक्ट्रिक ग्रेमलिन्स या कारणांमुळे जिप्सी ही आगळी वेगळी ओळख आहे. चिराग पासवान यांच्याजवळ असलेला हा मॉडेल २०१५ चा आहे. ज्याची किंमत ५ लाख रूपये आहे. २०१५ च्या या मॉडेलमध्ये १.३ लीटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे दिले जाते जे ८० बीएचपी आणि १०३ एनएम चा टॉक निर्माण करतात.

टोयोटा फॉर्च्यूनर

जिप्सीप्रमाणे, टोयोटा फॉर्च्यूनर ही एक लोकप्रिय कार आहे. भारतात पहिल्यांदा लाँच करताच ही लोकांच्या पसंतीस उतरली होती. फॉर्च्यून ही ऑन रोड आणि ऑफ रोड चालवण्यास सक्षम आहे. या गाडीचा मस्कुलर स्टांस रस्त्यावर चांगली कामगिरी दाखवतो.

चिराग पासवान यांच्याजवळ २०१४ चा मॉडेल टोयोटा फॉर्च्यूनर आहे जो ३.० लीटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन द्वारे देतो जो गिअरबॉक्सचा उपयोग करून 171बीएचपी आणि 343 एनएम चा टॉर्क निर्माण करतो. फॉर्च्यूनर ४×२ कॉन्फीगरेशन मध्ये उपलब्ध आहे.