Mahindra XUV400 Electric SUV: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्राच्या वाहनांना नागरिकांची प्रचंड पसंती मिळत आहे. कंपनीचे कोणतेही वाहन बाजारात लाँच होताच, ते बेस्ट सेलर बनतात. महिंद्राने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार गेल्या वर्षी लाँच केली होती. या नवीन इलेक्ट्रिक कारचं नाव महिंद्रा एक्सयूव्ही ४०० (Mahindra XUV400) असं आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर ४५६ किलोमीटर पर्यंतची रेंज देते. जी सध्या भारतातली सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. आता जर तुम्ही महिंद्राची ही नवी कार खरेदीसाठी वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्राने अखेर १६ जानेवारी रोजी त्यांच्या इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट SUV XUV400 च्या किंमतीचा देखील खुलासा केलायं…

Mahindra XUV400 Electric SUV अशी आहे खास

XUV 400 ही नवी इलेक्ट्रिक कार XUV 300 वर आधारित आहे. पण या नव्या कारचा लूक वेगळा आहे. यात नवीन डिझाइन केलेले टेलगेट आणि बंपर डिझाइन वापरण्यात आले आहे. तसेच त्याची टेललॅम्प डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यामध्ये नवीन हेडलाइट्स, क्लोज्ड फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्स आहेत. या कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. ३५०V आणि ३८०V चे पॉवरट्रेन उपलब्ध आहेत.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक
Hash oil worth crores of rupees seized and four arrested
ठाणे : कोट्यवधी रुपयांचे ‘हॅश’ तेल जप्त, चार जणांना अटक

बॅटरी फीचर्स
याच्या छोट्या बॅटरीची रेंज कमी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ३०० ते ३५० किलोमीटरचे अंतर पार करू शकते. मोठी बॅटरी यापेक्षा अधिक अंतर पार करू शकते. या कारची तुलना टाटाच्या नेक्सॉन ईवीशी केली जात आहे.

(हे ही वाचा : तरुणांना वेड लावणाऱ्या Royal Enfield च्या सुपरबाईकची किंमत आली समोर, झटपट करा बुकींग)

Mahindra XUV400 Electric SUV किंमत

ही कार EC आणि EL या दोन भिन्न प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तसेच Mahindra XUV400 EV ची किंमत रु. १५.९९ लाख आणि रु. १८.९९ लाख दरम्यान आहे.

इलेक्ट्रिक SUV साठी पहिल्या बुकिंगसाठी ५,००० ही किंमत आहे. महिंद्राने असा दावाही केला आहे की लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे २०,००० युनिट्स वितरित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Mahindra XUV400 Electric SUV बुकिंग कधी सुरु होणार?

या SUV साठी बुकिंग २६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात, XUV400 भारतातील ३४ शहरामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. XUV400 EL ची डिलिव्हरी मार्च २०२३ मध्ये सुरू होईल.