Mahindra Electric SUVs In India: भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. महिंद्राने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी यूकेमध्ये प्रदर्शित केलेल्या इलेक्ट्रिक कार आता थेट भारतात येणार आहेत. हे १० फेब्रुवारी २०२३ रोजी हैदराबादमध्ये महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्राचे बॉर्न इलेक्ट्रिक वाहन भारतात येण्याची ही पहिलीच वेळ असेल. ब्रँडने दोन ब्रँड अंतर्गत पाच इलेक्ट्रिक एसयूव्हीचे अनावरण केले होते – XUV आणि BE नावाचा नवीन इलेक्ट्रिक ब्रँड. यामध्ये XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. नवीन SUV INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत.

(हे ही वाचा : Mahindra Thar आता ५ लाखात आणा घरी, पाहा कुठे मिळतेय ही जबरदस्त डील )

यातील पहिल्या चार इलेक्ट्रिक SUV २०२४ ते २०२६ दरम्यान लाँच केल्या जातील, ज्यांची विक्री भारतात सुरू होईल. महिंद्राने इलेक्ट्रिक वाहनांसाठी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी प्लॅन्टला मंजुरीही मिळाली आहे.

कंपनी पुणे, महाराष्ट्र येथे नवीन प्लांट उभारणार आहे. हा प्लांट आगामी बॉर्न इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी वापरला जाईल. ऑटोमेकरला २०२७ पर्यंत त्याच्या पोर्टफोलिओचा एक चतुर्थांश भाग इलेक्ट्रिक वाहनांचा असेल अशी अपेक्षा आहे.

महिंद्राने अलीकडेच EC आणि EL या दोन प्रकारांमध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित XUV400 लाँच केले आहे. यात ३४.५ kWh आणि ३९.४ kWh चा बॅटरी पॅक आहे. त्यांची रेंज अनुक्रमे ३७५ किमी आणि ४५६ किमी असेल असा दावा करण्यात आला आहे. या इलेक्ट्रिक मोटर्स १४८ Bhp आणि ३१० Nm जनरेट करतील.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra is going to present its new cars at the upcoming mahindra ev fashion festival to be held in hyderabad on february 10 pdb
First published on: 03-02-2023 at 10:38 IST