scorecardresearch

Mahindra & Mahindra कंपनीच्या गाड्या झाल्या इतक्या महाग, जाणून घ्या कारणं

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

Mahindra-Thar
Mahindra & Mahindra कंपनीच्या गाड्या झाल्या इतक्या महाग, जाणून घ्या कारणं

Mahindra & Mahindra Hike Prices : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन किंमत १४ एप्रिल २०२२ पासून लागू झाली आहे. महिंद्राने स्टॉक एक्स्चेंजलाही याबाबत माहिती दिली आहे. महिंद्राने आपल्या कार आणि एसयूव्हीच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अशा स्थितीत आता महिंद्राची वाहने १० ते ६३ हजार रुपयांपर्यंत महागली आहेत. ही किंमत वाहनाच्या मॉडेल आणि व्हेरिएंटच्या आधारावर करण्यात आली आहे.

उत्पादन खर्च वाढला: महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले की, वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांत स्टील, अ‍ॅल्युमिनियमसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या निर्मितीचा खर्चही वाढला आहे.

खर्चात वाढ झाल्याने नफ्यावर परिणाम: कोणत्याही कार निर्मात्यासाठी उत्पादन खर्च खूप महत्त्वाचा असते. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के सामग्रीची किंमत असते. यामुळे कंपनीच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे. यामुळेच महिंद्र अँड महिंद्राला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

महिंद्राच्या एसयूव्हीच्या किमतीही वाढल्या: महिंद्राच्या XUV3oo, XUV7oo, XUV5oo आणि थार एसयूव्हीच्या किमतीतही वाढ झाली आहे. या चारही एसयूव्ही महिंद्राच्या सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहेत. याशिवाय महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा टीयूव्ही, महिंद्रा बोलेरो सारख्या कारचे उत्पादन करते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra mahindra cars expensive find out why rmt

ताज्या बातम्या