scorecardresearch

महिंद्राच्या ‘या’ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, ऑफर असूनही विकल्या गेल्या फक्त ‘इतक्या’ युनिट्स

महिंद्राची कार फीचर्समध्ये जबरदस्त असूनही ग्राहकांनी ‘या’ कारकडे पाठ फिरविली आहे.

Mahindra Marazzo
महिंद्राच्या 'या' कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ (Photo-financialexpress)

Mahindra Marazzo Sales In Feb 2023: भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचं बाजारपेठेत वर्चस्व आहे. भारतीय बाजारात महिंद्रा कंपनीच्या कार सर्वाधिक पसंत केल्या जातात. मात्र, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १८,२६४ कारच्या तुलनेत महिंद्राने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकूण २९,३५६ कार विकल्या आहेत. म्हणजेच, वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीत ६० टक्क्यांहून अधिक वाढ आहे. कंपनीने नव्याने लाँच केलेल्या Scorpio-N आणि अपडेटेड Scorpio Classic ने या वाढीला मोठा हातभार लावला आहे. पण, एक महिंद्राची एमपीव्ही आहे जी एकंदरीत इतकी चांगली कामगिरी करत आहे, तरीही परंतु कंपनीच्या या कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. चला तर पाहूया कोणती आहे ही कार….

‘या’ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

महिंद्रा ही देशातील चौथ्या क्रमांकाची कार कंपनी राहिली आहे. महिंद्रा भारतात स्कॉर्पिओ ते महिंद्रा थार आणि XUV700 पर्यंतच्या कारची विक्री करते, ज्यांचा प्रतीक्षा कालावधी अनेक महिने असतो. दरम्यान, कंपनीची एक एसयूव्ही देखील आहे जी ग्राहकांना अजिबात खरेदी करायची नाही. महिंद्राच्या या कारकडे ग्राहकांना पाठ फिरविली आहे. ‘Mahindra Marazzo’ असे या कारचे नाव असून या कारची फारच कमी विक्री झाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, महिंद्राला त्याच्या Marazzo MPV च्या फक्त १७१ युनिट्सची विक्री करता आली.

(हे ही वाचा : नो मायलेजचे टेन्शन! ७ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील ‘या’ आहेत सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कार )

Mahindra Marazzo मध्ये काय आहे खास?

Mahindra Marazzo कारची किंमत १३.४१ लाख ते १५.७० लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे M2, M4+ आणि M6+ प्रकारांमध्ये येते. यात ७-सीटर आणि ८-सीटर कॉन्फिगरेशन पर्याय आहेत. जर आपण इंजिन, ट्रान्समिशन आणि परफॉर्मन्सबद्दल बोललो तर ते १.५ लीटर डिझेल इंजिनसह येते, जे १२२ PS पॉवर आणि ३०० Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय नाही आणि पेट्रोल इंजिनचा पर्यायही नाही.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात ७.०-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम (Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह), रिमोट कीलेस एंट्री, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि १७-इंच अलॉय व्हील यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. सुरक्षेसाठी, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याची विक्री जवळजवळ नगण्य आहे, अशा परिस्थितीत, कंपनी या महिन्यात (मार्च) Marazzo वर ६०,२०० रुपयांची कर ऑफर देत आहे, ज्याबद्दल तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपवरून जाणून घेऊ शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या