scorecardresearch

Mahindra Discount: महिंद्रा कंपनीची फेब्रुवारी महिन्यात नविन गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घ्या किती आहे सवलत

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या काही मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे.

Mahindra Discount: महिंद्रा कंपनीची फेब्रुवारी महिन्यात नविन गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घ्या किती आहे सवलत
Mahindra Discount: महिंद्रा कंपनीची फेब्रुवारी महिन्यात नविन गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घ्या किती आहे सवलत

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या काही मॉडेल्सवर भरघोस सूट देत आहे. कंपनीने या महिन्यासाठी निवडक मॉडेल्सवर ८१,५०० रुपयांतची सूट दिली आहे. मात्र यात एस्कयूव्ही 700, थार किंवा बोलेरो निओ एसयूव्ही सारख्या फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश नाही. फेब्रुवारीमध्ये महिंद्रा एसयूव्ही खरेदी करताना किती बचत होऊ शकते यावर एक नजर टाकूयात.

कंपनीद्वारे या महिन्यात दिली जाणारी सर्वात मोठी सवलत त्यांच्या लाइनअपमधील सर्वात महागड्या एसयूव्हीवर आहे. Alturas G4 एसयूव्हीवर फेब्रुवारीमध्ये ८१,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. Alturas G4 वर ५० हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह कॉर्पोरेट सूट आणि अतिरिक्त ३१ हजार ५०० रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर दिल्या जात आहे. महिंद्रा कंपनीने भारतात Alturas G4 एसयूव्ही दोन ट्रिममध्ये ऑफर करते. २.२ लिटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित, Alturas G4 2WD आणि 4WD पर्यायांमध्ये येते. या गाड्यांची किंमत २८.८५ लाखापासून सुरू होते आणि ३१.८५ लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. Alturas G4 भारतीय बाजारपेठेत टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरला टक्कर देते.

Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”

महिंद्राची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 वर सवलत दिली गेली आहे. कंपनी या मॉडेलसाठी ६९ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. येत्या काही दिवसात या गाडीची फेसलिफ्ट आवृत्ती दिसण्याची शक्यता आहे. ३० हजार रुपयांच्या रोख सवलती व्यतिरिक्त, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि १० रुपये किमतीचे इतर सवलती दिल्या जात आहेत. महिंद्रा कंपनीने XUV300 एसयूव्ही १६ प्रकारांमध्ये आणली आहे. बेस१.२ -लीटर पेट्रोल W4 व्हेरियंटची किंमत ८.१६ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक व्हेरिएंट १.५-लीटर डिझेल ऑटोमॅटिक W8 ट्रिमसाठी १३ लाख ६७ हजारापर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

महिंद्राच्या तीन इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलं टीझर

महिंद्राची परवडणारी एसयूव्ही KUV100 NXT ला देखील ६० हजारांपेक्षा जास्त सूट मिळते. या गाडीसाठी ३८ हजारंची रोख सवलत देत इतर सवलती मिळून ही रक्कम ६० हजारांपर्यंत जाते. या तीन एसयूव्ही व्यतिरिक्त महिंद्रा या महिन्यात स्कॉर्पिओसाठी ३४ हजारांपर्यंत आणि बोलेरो एसयूव्हीसाठी २४ हजार रुपयांपर्यंतची सूट देते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या