scorecardresearch

सनरुफ बंद असतानाही महिंद्राच्या ‘या’ लोकप्रिय कारमध्ये घुसलं पाणी आणि नंतर जे घडलं, वाचा एकदा…

महिंद्राच्या ‘या’ एसयुव्हीची बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे.

Mahindra Scorpio N
Mahindra Scorpio N मध्ये शिरलं पाणी (Photo-instagram.com/arunpanwarx)

महिद्रा कंपनीने नुकतेच Mahindra Scorpio N लाँच केले आहे, ज्याला कंपनीने सनरूफसह सादर केले आहे. डिझाइन, बॉडी, इंजिन आणि पॉवर यामुळे ही एसयूव्ही बाजारात खूप पसंत केली जात आहे. पण नुकताच आलेला Mahindra Scorpio N चा एक व्हिडीओ पाहून सर्व चकीतच झाले आहेत. या कारचा सनरुफ बंद असतानाही कारच्या आत पाणी शिरल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, हे प्रकरण सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओचे आहे, जो अरुण पवार नावाच्या युट्यूबरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एक कार चालक आपली स्कॉर्पियो-एन एका धबधब्याखाली घेऊन जातो. यावेळी कारचं सनरुफ देखील पूर्णपणे बंद असतात. पण जसजसी ही कार धबधब्याखाली जाते तसं तसं कारच्या आत सनरुफच्या आजूबाजूनं पाणी आत येताना दिसतं. अगदी धबधब्याची धार कारमध्ये लागते. केबिनच्या छतावर लावलेल्या एसी व्हेंट्स, स्पीकरमधून पाणी शिरू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  हे पाहून युट्युबरही थक्क होऊन जातो.

(हे ही वाचा : Mahindra XUV700 गाडीत पेट्रोल ऐवजी भरले डिझेल आणि नंतर जे घडलं, वाचा एकदा…)

या कारमध्ये पाणी शिरल्याने सीट, गिअर बॉक्स, डॅशबोर्ड पाणीमय होऊन गेलं. या पाण्याचा वाढता प्रवाह पाहून कार चालक आपली कार धबधब्याखालून बाहेर काढतो. युट्युबर अरुण पवार यांनी युट्युबवर हा ५३ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये पाणी शिरल्याच्या या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

आदित्य सिंह नावाच्या युजरने लिहिले की, याच कारणामुळे टोयोटा आपल्या फॉर्च्युनरमध्ये सनरूफ देत नाहीये. एका यूजरने लिहिले की, स्कॉर्पिओने अंघोळ करण्यापूर्वी रेनकोट घातला असेल. तर एकाने लिहिले लिकेज होत असेल.

कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ N लाँच केले आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत १.९९ लाख रुपये आहे. नवीन स्कॉर्पिओ एन आउटगोइंग मॉडेल क्लासिकपेक्षा रुंद, उंच आणि लांब आहे. SUV नवीन शिडी-फ्रेम चेसिसवर आधारित आहे, ज्यामुळे ती स्कॉर्पिओ क्लासिकपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत बनते. स्कॉर्पिओ N साठी प्रतीक्षा कालावधी भिन्नतेनुसार 6 ते 14 महिन्यांपर्यंत बदलतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 15:26 IST
ताज्या बातम्या