नव्या Mahindra Scorpio चा टीझर रिलीज; आनंद महिंद्रा म्हणतात….

कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे.

Mahindra Scorpio new teaser released
आनंद महिंद्रा यांनी कंपनीने जारी केलेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

महिंद्रा लवकरच भारतात ग्राहकांची आवडती स्कॉर्पिओ एसयूव्ही पूर्णपणे नवीन शैलीत सादर करणार आहे. नुकतंच कंपनीने कारचा एक नवीन टीझर व्हिडीओ जारी केला आहे, ज्यावर महिंद्रा ग्रुपचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट केले आहे. कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे, जो पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “या एसयूव्हीमध्ये कोण कोणते फिचर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेरलॉक होम्स होण्याची गरज नाही.”

आनंद महिंद्रा यांनी कंपनीने जारी केलेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “यावेळी एक मोठा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. पण कोण कोणते फिचर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेरलॉक होम्स होण्याची गरज नाही.” या एसयूव्हीच्या पहिल्या टीझरमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.

महिंद्राच्या न्यू जनरेशन स्कॉर्पिओला एसयूव्हीचा ‘बिग डॅडी’ म्हणून ओळखत आहे आणि येत्या काही दिवसांत ती भारतात लॉंच होणार आहे. एसयूव्हीच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे जून २०२२ मध्ये कंपनी नवीन स्कॉर्पिओ लॉंच करू शकते. लेटेस्ट स्पाय फोटोंमधून एसयूव्हीच्या केबिनचे सर्व फीचर्स समोर आले आहेत.

३१२ फूट उंचीवरील जगातील सर्वांत लांब झुलता पूल पर्यटकांसाठी खुला; पाहा फोटो

नवीन स्पाय शॉट्समध्ये न्यू जनरेशन महिंद्रा स्कॉर्पिओच्या केबिनचे स्पष्ट फोटो समोर आले आहेत. नवीन २०२२ एसयूव्हीच्या केबिनमध्ये, कंपनीने टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ड्युअल टोन ब्लॅक आणि ब्राऊन इंटीरियर थीम, मोठ्या आकाराची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, सेंटर कन्सोलवर आडवे एसी व्हेंट्स, दुसऱ्या रांगेतील एसीसह फॅन स्पीड कंट्रोल दिला आहे. यासोबतच नवीन थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, फ्रंट डोअर स्पीकर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

राहतं घर विकून जोडप्याने क्रूझ जहाजावर हलवला कायमचा मुक्काम; कारण वाचून व्हाल थक्क

२०२२ महिंद्रा स्कॉर्पिओला मिळणार्‍या इतर वैशिष्ट्यांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच लाँच झालेल्या महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मध्ये पाहिल्याप्रमाणे प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली असू शकते. कारच्या टॉप मॉडेलमध्येही हे फिचर असण्याची शक्यता आहे. येथे ग्राहकांना १०-स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सर्वत्र एलईडी लाईट्स, ६ एअरबॅग्ज आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी हाय-टेक फीचर्स देखील मिळू शकतात. कंपनी या कारसोबत ३६०-डिग्री कॅमेरा देखील देणार आहे, ज्यामुळे नवीन स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या दृष्टीने एक उत्तम एसयूव्ही ठरणार आहे.

महिलेने एकाचवेळी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मुलांना दिला जन्म; हॉस्पिटलमधील कर्मचारीही झाले हैराण

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एसयूव्हीमध्ये मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग यांसारखी फीचर्स मिळू शकतात. न्यू जनरेशन स्कॉर्पिओ १५५ बीएचपी पॉवर आणि ३६० एनएम पीक टॉर्क बनवणारे २.० -लीटर एमहॉक टर्बो पेट्रोल आणि १५० बीएचपी पॉवर आणि ३०० एनएम पीक टॉर्क बनवणारे २.० ४-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह आढळू शकते. कंपनी या दोन्ही इंजिन पर्यायांना ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahindra scorpio new teaser release know what anand mahindra said in his tweet pvp

Next Story
Summer Car Care Tips: उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या तुमच्या कारची काळजी, फॉलो करा सोप्या टिप्स
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी