जम्मू आणि काश्मीरमधील न्यायालयाने शुक्रवारी एका व्यक्तीला त्याच्याच कारमध्ये वाटेल तसे बदल केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं आहे. आपली महिंद्रा थार ही कार मॉडिफाय केल्याप्रकरणी एका व्यक्तीला तब्बल सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. बेकायदेशीरपणे गाडीमध्ये बदल केल्याप्रकरणी ही व्यक्ती दोषी आढळली असून गाडीची मूळ रचना बदलण्याबरोबरच या व्यक्तीने गाडीवर सायरनही लावला होता. जम्मू-काश्मीरमधील मोटर व्हेइकल अ‍ॅक्ट १९८८ मधील ५२ व्या कलमानुसार (जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश विरुद्ध अदिल फारुखी भट प्रकरण) अशाप्रकारे गाडीमध्ये बदल करणे कायदेशीर कारवाईसाठी पात्र गुन्हा आहे.

महिंद्रा थारचं जुनं मॉडेल असलेल्या या गाडीचं छप्पर बदलण्यात आलं आहे. गाडीचे टायर हे अधिक मोठ्या आकाराचे करण्यात आलेत. गाडीवर एलईडी लाईट्स आणि सायरन लावण्यात आला आहे असा दावा न्यायालयासमोर वाहतूक विभागाने करताना संबंधित पुरावेही सादर केले. न्यायालयाच्या निकालानुसार गाडीची रचना ही पूर्णपणे किंवा अंशत: तिच्या मूळ स्वरुपाहून वेगळी करण्यात आली आहे. गाडीच्या मूळ नोंदणी प्रमाणपत्रातील (आरसी बूक) माहितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे बदल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आलं असून त्यासाठी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Supreme Court Grants Conditional Bail to former professor Shoma Sen in Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन, या अटी घातल्या…
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता
High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी

मात्र गाड्यांची रचना बदलण्यासंदर्भातील कायद्यामधील सूटही या आरोपीला मिळाली आहे. यापूर्वी आरोपी अशाप्रकारच्या कोणत्याही गुन्हामध्ये सहभागी नसल्याचं लक्षात घेत शिक्षा सुनावताना या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. न्यायालयाने या आरोपीकडून दोन लाखांच्या कररापत्रावर पुढील दोन वर्षांसाठी या प्रकरणासंदर्भातील वर्तन हे कायद्याच्या चौकटीत राहणार असेल असं लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत. तर या कराराप्रमाणे आरोपीची वर्तवणूक नसेल तर त्याला ठोठावण्यात आलेली सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल.

“काश्मीरमधील श्रीनगर येथील आरटीओ अधिकाऱ्यांनी या गाडीवरील सायरन काढावा तसेच कायद्याचं उल्लंघन करुन जे बदल करण्यात आलेत ते सुद्धा गाडीवर दिसणार नाहीत याची काळजी घेत गाडी आधीप्रमाणे करावी. गाडीची रचना तिच्या मूळ आरसी बूकप्रमाणे करावी,” असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.