महिंद्राची एक्सयूव्ही ७०० आणि थार हे दोन्ही वाहन बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कमी किंमतीत सनरूफ आणि ADAS तंत्रज्ञान मिळत असल्याने एक्सयूव्ही ७०० ग्राहकांना भूरळ घालत आहे. थार ऑफरोडींगसाठी पसंत केली जात आहे. या दोन्ही वाहनांचा बुकींग आणि प्रतीक्षा कालावधी मोठा आहे. यातून त्यांची मागणी समजून येते. दरम्यान या दोन्ही वाहनांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) महिंद्रा एक्सयूव्ही ७००

Mahindra xuv 700 च्या पट्रोल व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये २२ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेल व्हेरिएंटच्या किंमतीत २० हजार ते ३७ हजार रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. या वाहनाच्या एडब्ल्यूडी ७ सीटर टॉप स्पेक एx7 व्हेरिएंटच्या किंमतीत ३७ हजार रुपये आणि एx3 एमटी ५ सीटर व्हेरिएंटच्या किंमतीत २० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वर्षी दोन्ही वानांच्या किंमती ही तीसरी वाढ आहे.

२) महिंद्रा थार

थारला अलिकडेच हल्का अपडेट मिळाला आहे. Mahindra Thar एएक्स ओ आणि एलएक्स या दोन ट्रिममध्ये पेट्रोल आणि डिझेल पर्यायांसह येते. टॉप स्पेक एलएक्स एटी हार्ड टॉप पेट्रोल व्हेरिएंटच्या किंमतीत ७ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर इतर सर्व पेट्रोल व्हेरिएंट आता ६ हजार रुपयांनी महाग झाले आहेत.

ग्राहकाने खरेदी केली एक्सयूव्ही, आनंद महिंद्रा म्हणाले..

आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. कतृत्ववान, नवनिर्मितीक्षम लोकांना ते प्रोत्साहन देतात. सध्या आनंद महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने महिंद्राची नवीन एक्सयूव्ही ७०० विकत घेतली. या व्यक्तीसोबत त्यांची मुलगी देखील होती. एक्सयूव्ही पाहून चिमुकल्या मुलीचा आनंद गगनाला मावेनासा झाल्याचे दिसून येत आहे. यावर आनंद यांनी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी थोटा श्रीकांत यांची पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. आनंद महिंद्रा यांनी please tell your daughter she just made my day असे म्हणत एक आनंद व्यक्त दर्शवणारा इमोजी शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra xuv 700 and thar price increased ssb
First published on: 20-09-2022 at 10:52 IST