देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनोचा नवीन जनरेशन लवकरच लॉन्च करणार आहे. तसेच यावेळी कंपनीने नवीन जनरेशन मारुती बलेनोची लॉन्च तारीख जाहीर केली आहे, त्यानुसार कंपनी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी देशांतर्गत बाजारात ही कार सादर केली जाणार आहे.

मारुती सुझुकीने या बलेनोचा हा नवा लुक सध्याच्या कारपेक्षा अगदी वेगळा बनवला आहे, ज्यासाठी त्याची रचना बदलण्यात आली आहे आणि या कारचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन अपडेट करण्यात आले आहेत. तर या कंपनीने नवीन जनरेशनच्या मारुती बलेनोमध्ये हाय-टेक फीचर्ससह एडवांस सेफ्टी हे फीचर्स देखील जोडली आहेत, त्यामुळे आता ही कार आणखी प्रीमियम बनली आहे.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जर तुम्हाला न्यू जनरेशन मारुती बलेनो खरेदी करायची असेल, तर कंपनीने या कारचे प्री-बुकिंग सुरू केले आहे, ज्यामध्ये तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या मारुती नेक्सा डीलरशिपला भेट देऊन बुक करू शकता, ज्यासाठी तुम्ही ही कार ११ हजार रुपये या निश्चित केलेल्या टोकन रक्कमेने बूक करू शकता.

न्यू जनरेशन मारुती बलेनोच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी १.२ लीटर VVT आणि १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देणार आहे, ज्यामध्ये पूर्वीप्रमाणे असलेल्या ५ स्पीड मॅन्युअल आणि IMT ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल करप्ले (Apple CarPlay) कनेक्टिव्हिटीसह ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, ज्यामध्ये कार कनेक्टेडसाठी टेक्नॉलजीचे फीचर्स देखील असेल. याशिवाय ३६० डिग्री कॅमेरा, ८-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि नेव्हिगेशन फीचर देखील मिळू शकतात.

कार सुरक्षेच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, ISO फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स मिळतील.

कंपनीने अद्याप नवीन जनरेशन मारुती बलेनोच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु तज्ञांच्या मते, कंपनी ६.७५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह ही कार लॉन्च करू शकते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये नवीन रूपात ही कार आल्यानंतर, या नवीन जनरेशन असलेल्या मारुती बलेनोची थेट स्पर्धा Hyundai i20, Tata Altroz, इत्यादी कारशी होण्याची शक्यता कंपनीने केली आहे.