मारुती सुझुकीने अलीकडेच त्याची प्रिमियम हॅचबॅक मारुती बलेनो अपडेट केली आणि बाजारात त्याची फेसलिफ्ट वर्जन लॉंच केली. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये १८,४१८ युनिट्सच्या विक्रीसह ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.

Maruti Baleno Price
मारुती बलेनो सिग्मा व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत म्हणजेच बेस मॉडेल ६,४९,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन रोड असताना ही किंमत ७,३८,०३४ रुपये इतकी वाढते.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
The Shapoorji Palanji Group on Tuesday announced the sale of Gopalpur Port in Odisha to Adani Ports and SEZ for Rs 3350 crore
अदानीं’च्या बंदर-सत्तेचा विस्तार; एसपी समूहाकडून गोपाळपूर बंदराची ३,३५० कोटींना खरेदी

मारुती बलेनोची एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमत जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला ही प्रीमियम हॅचबॅक खरेदी करण्याच्या सुलभ डाउन पेमेंट आणि EMI योजना जाणून घेता येतील, जेणेकरून बजेटच्या अडचणीच्या बाबतीत ही कार फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करता येईल.

मारुती बलेनोचे बेस मॉडेल म्हणजेच सिग्मा व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७४,००० रुपयांची आवश्यकता असेल. ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरच्या गणनेत्यानुसार, फायनान्स प्लॅनद्वारे ही कार खरेदी केल्यावर बँक तुम्हाला वार्षिक ९.८ टक्के व्याजदरासह ६,६४,०३४ रुपये कर्ज देईल.

कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला मारुती बलेनोसाठी किमान डाउन पेमेंट म्हणून ७४,००० रुपये जमा करावे लागतील आणि कर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ६० महिन्यांसाठी दरमहा १४,०४४ रूपयांचा मासिक EMI भरावा लागेल.

आणखी वाचा : Ola तब्बल २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता

Maruti Baleno Full Details

Maruti Baleno Sigma mileage
मारुती बलेनो २२.३५ kmpl चा दावा करते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Maruti Baleno Sigma Engine and Transmission
मारुती बलेनोमध्ये ११९७ cc चे इंजिन देण्यात आले असून त्यात मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन ८८.५० bhp पॉवर आणि ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Baleno Sigma Features
मारुती बलेनोमध्ये हेड अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा, मल्टी फंक्शन स्टीयरिंग व्हील, ऑटो क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिअर पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स जोडण्यात आली आहेत.

(महत्त्वाची माहिती: फायनान्स प्लॅनद्वारे कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे योग्य बँकिंग आणि CIBIL स्कोर असणे आवश्यक आहे. तुमच्या बँकिंग किंवा CIBIL स्कोअरमध्ये नकारात्मक अहवाल आल्यास बँक आपली योजना बदलू शकते.)