Maruti Brezza CNG Launch: दिग्गज वाहन कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक नवनवीन कार लाँच केल्या आहेत. आता मारूती सुझुकीने ‘मारुती ब्रेझा सीएनजी’ लाँच केली आहे. Brezza ची CNG आवृत्ती २०२३ ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. तेव्हापासून ते लवकरच लाँच होईल, असे मानले जात होते. सीएनजी किटसह ऑफर केलेली ही त्याच्या विभागातील एकमेव एसयूव्ही आहे. बाजारपेठेतील टाटा नेक्सॉन आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या कारशी त्याची स्पर्धा होईल.

Maruti Brezza CNG मध्ये काय असेल खास?

नवीन ब्रेझा सीएनजीला फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटसह समान १.५-लिटर K१५C ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन मिळते, जे नियमित पेट्रोल ब्रेझासह देखील येते. CNG मोडमध्ये, हे इंजिन ५,५००rpm वर ८७.८PS आणि ४२००rpm वर १२१.५ Nm जनरेट करते. तर, पेट्रोल मोडमध्ये इंजिन १००.६PS आणि १३६ Nm आउटपुट करते.  ब्रेझा सीएनजीचे मायलेज २५.५१ किमी-प्रति किलो आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

(हे ही वाचा : Honda Shine 100 की Hero Splendor Plus पाहा भारतात कोणती बाईक नंबर वन..?)

यात अनेक CNG विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. पेट्रोल आणि सीएनजी फ्यूल लिड, सीएनजी ड्राइव्ह मोड, डिजिटल-अॅनालॉग फ्यूल गेज आणि फ्यूल चेंज स्विच यांसारख्या फीचर्ससह येते. याशिवाय, कारमध्ये ९-इंचाचा स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले, कीलेस पुश स्टार्ट आणि क्रूझ कंट्रोल आहे. ब्रेझा सीएनजी हे मारुती सुझुकीचे चौदावे उत्पादन आहे जे फॅक्टरी-फिटेड सीएनजी ऑफर करते. यासह, मारुती सुझुकी अरेना डीलरशिप नेटवर्कद्वारे विकल्या जाणार्‍या सर्व कार आता S-CNG तंत्रज्ञान पर्यायासह उपलब्ध आहेत.

Maruti Brezza CNG किंमती

आता कंपनी ब्रेझाच्या सीएनजी मॉडेलचे बुकिंग सुरु केले आहे. हे मॉडेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा अधिकृत डिलरशिपद्वारे बुकिंग केले जाऊ शकते. Brezza CNG चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, LXI, VXI, ZXI आणि ZXI ड्युअल टोन यांचा समावेश आहे. Maruti Brezza LXI S-CNG व्हेरियंटची किंमत ९.१४ लाख रुपये आहे. Maruti Brezza VXI S-CNG व्हेरियंटची किंमत १०.४९ लाख रुपये आहे. Maruti Brezza ZXI S-CNG व्हेरियंटची किंमत ११.८९ लाख रुपये आहे. तर Maruti Brezza ZXI S-CNG ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत १२.०५ लाख रुपये आहे.