scorecardresearch

मार्केटमध्ये तुफान मागणी असणाऱ्या मारुतीच्या ‘या’ कारला १ लाखात घरी आणा, एवढा बसेल EMI

Car Finance Plan: तुम्हाला मारुती कंपनीची कार खरेदी करायची असेल तर ती तुम्ही फक्त १ लाखात घरी घेऊन जाऊ शकता. कमी बजेट असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Maruti Brezza Lxi
एक लाखाचे डाऊनपेमेंट करुन Maruti Brezza खरेदी करा (Photo-financialexpress)

Maruti Brezza Lxi: मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही मारुती ब्रेझा लाँच केली आहे. लाँच झाल्यापासून SUV ला प्रचंड यश मिळाले आहे. ही SUV तिची किंमत, मायलेज, फीचर्स आणि डिझाईनमुळे लोकांमध्ये पसंत केली जात आहे. जर तुम्हाला मारुती ब्रेझा आवडत असेल आणि ती खरेदी करण्याचा विचारही करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला ही एसयूव्ही १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर सोपा फायनान्स प्लॅनवर कशी खरेदी करता येईल याविषयी माहिती देणार आहोत.

Maruti Brezza किंमत

मारुती ब्रेझाच्या बेस मॉडेलची किंमत ८,१९,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ऑन-रोड झाल्यानंतर, या बेस मॉडेलची किंमत ९,१९,२२६ रुपये होते.

(हे ही वाचा : प्रवास होणार सुरक्षित! जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह Maruti ने बाजारात आणली नवी सेडान, जाणून घ्या किंमत )

Maruti Brezza फायनान्स प्लॅन

तुमचे बजेट १ लाख रुपये असल्यास, ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या SUV साठी वार्षिक ८.९ टक्के व्याजदरासह ८,१९,२२६ रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते.

Maruti Brezza डाउन पेमेंट आणि मासिक EMI

एकदा मारुती ब्रेझासाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या कारच्या डाऊन पेमेंटसाठी १ लाख रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला १७,३२६ रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 13:37 IST