देशात मारुती सुझुकीचा दबदबा कायम आहेच, मात्र या कंपनीच्या वाहनांनी देशाबाहेरील ग्राहकांना देखील भूरळ घातली आहे. अलिकडे ब्रेजा या कारची देशाबाहेर मागणी वाढली आहे. कंपनीने १५५.५९ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह कारच्या ६ हजार २६७ युनिटची विक्री केली आहे. त्यानंतर किया सेल्टोस ४ हजार ८२७ युनिट, निसान सनी ४ हजार ६४६, ह्युंडाई वर्णा ४ हजार ९४ युनिट आणि मारुती स्विफ्टच्या ३ हजार ११३ युनिटची देशाबाहेर विक्री झाली आहे.

टॉप १० मध्ये या वाहनांचेही स्थान

अन्य मॉडेल्समध्ये ह्युंडाई ग्रँड आय १० ही २ हजार ८९६ युनिट, मारुती बलेनो २ हजार ८५५ युनिट, किआ सोनेट २ हजार ७१५, मारुती डिझायर २ हजार ४०६ आणि ह्युंडाई क्रेटाच्या २ हजार ४०४ युनिटची विक्री झाली आहे.

(अधिक विक्रीच्या शर्यतीत रॉयल इन्फिल्डची ‘ही’ बाईक सुसाट; हंटर, मेटिओर, हिमालयनलाही सोडले मागे)

अल्टो आणि आय २० टॉप ३० मध्ये

सर्वात अधिक निर्यात होणाऱ्या वाहनांमध्ये मारुतीची आल्टो आणि ह्युंडाईच्या i20 ने देखील आपले स्थान निर्माण केले आहे. आय २० ला २२ आणि आल्टोला २५ वे स्थान मिळाले आहे. त्यांच्याबरोबर टॉप ३० मध्ये ह्युंडाई अल्काजार, किआ कॅरेन्स, वोक्सवॅगन वर्टस, ह्युंडाई वेन्यू, जीप कंपास, महिंद्रा एक्सयूव्ही ३०० आणि इतर वाहनांचा समावेश आहे.

ब्रेझाचे फीचर

ब्रेझामध्ये १ हजार ४६२ सीसीचे इंजन आहे जे १०१.६५ बीएचपीचा टॉर्क देतो. तसेच कारचा मायलेज २०.१५ किमी इतका आहे. या कारची सुरुवातीची किंमत ७.९९ लाख इतकी आहे जी १३.९६ लाख पर्यंत जाते.