scorecardresearch

Maruti Celerio vs Tata Tiago: कमी किमतीत पेट्रोल आणि CNG वर कोणती हॅचबॅक अधिक उत्तम? वाचा सविस्तर

Tata Tiago आणि Maruti Celerio या तुलनेत कोणती उत्तर कार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जास्त विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला त्या दोघांच्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती आज आम्ही देणार आहोत, जे तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय असू शकतात.

Maruti-Celerio-vs-Tata-Tiago
(फोटो- TATA, MARUTI)

हॅचबॅक सेगमेंट हा कार क्षेत्रातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक आवडलेला सेगमेंट आहे. या सेगमेंटमध्ये येणार्‍या गाड्यांची किमती आणि मोठी मायलेज हे याचं कारण होय, तुम्हालाही कमी बजेटमध्ये आकर्षक डिझाईन असलेली मोठी मायलेज देणारी कार घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय गाड्यांचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता, ज्या त्यांच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणल्या जातात.

Tata Tiago आणि Maruti Celerio या तुलनेत कोणती उत्तर कार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जास्त विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला त्या दोघांच्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती आज आम्ही देणार आहोत, जे तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय असू शकतात.

Maruti Celerio: मारुती सेलेरियो ही आकर्षक डिझाईन असलेली आगामी हॅचबॅक आहे जी सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देण्याचा दावा करते. कंपनीने नुकतेच ते नवीन अवतारासह सादर केले आहे.

कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 998 cc 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही मारुती सेलेरियो पेट्रोलवर २६.६८ किमी प्रति लीटर आणि सीएनजीवर ३५.६ किमी प्रति किलो मायलेज देते. मारुती सेलेरियोची सुरुवातीची किंमत ५.२५ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर जाताना ७ लाख रुपयांपर्यंत जाते.

आणखी वाचा : Suzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर

Tata Tiago: ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एक कार आहे जी तिच्या मायलेज आणि फिचर्समुळे पसंत केली जाते. कंपनीने या गाडीला सहा ट्रिमसह बाजारात आणले आहे.

या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 1199 cc चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

मायलेजबद्दल टाटा मोटर्सचा दावा आहे की ही हॅचबॅक कार पेट्रोलवर २३.८४ kmpl आणि CNG वर २६.४९ kmpl मायलेज देते. Tata Tiago ची सुरुवातीची किंमत ५.३८ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर जाताना ७.८० लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti celerio vs tata tiago which is better hatchback in price mileage and features know here prp

ताज्या बातम्या