देशाच्या कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी हॅचबॅक कारची आहे, ज्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे तिची कमी किंमत आणि मोठी मायलेज. लोकांची ही निवड लक्षात घेऊन कार निर्माते हॅचबॅक सेगमेंटमध्ये कमी किमतीत अधिक मायलेज देणार्‍या कार लॉंच करत आहेत.

या सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या कारपैकी एक मारुती सेलेरियो आहे जी कंपनीने अलीकडेच नवीन अवतारात लॉंच केली आहे. ज्यामध्ये आज आम्ही मारुती सेलेरियो ZXI AMT बद्दल बोलत आहोत जे या कारचे सर्वाधिक विकले जाणारे व्हेरिएंट आहे.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

Maruti Celerio ZXI AMT Price
Maruti Celerio ZXI AMT ची किंमत ६,४४,००० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी ऑन रोड ७,२१,२९७ रूपयांपर्यंत जाते. तुम्हाला ही कार विकत घ्यायची असेल, तर ती खरेदी करण्याचा सोपा फायनान्स प्लान येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : तुमची आवडती KTM Duke 200 स्पोर्ट्स बाईक केवळ ७० हजारात मिळवा, ऑफर वाचा

Maruti Celerio ZXI AMT Finance Plan
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही कार फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी केली तर बँक तुम्हाला यासाठी ६,५४,८८७ रुपये कर्ज देईल.

हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला ७३,००० रुपये किमान डाउन पेमेंट आणि त्यानंतर दरमहा १३,८५० रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

मारुती सेलेरियो ZXI AMT वर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या काळात बँक या गाड्यांवर दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

Maruti Celerio ZXI AMT Engine and Transmission
कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात ९९८ cc चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६५.७१ बीएचपी पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी या इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देते.

आणखी वाचा : Cheapest Cars India: देशातील टॉप ३ सर्वात स्वस्त कार, ४ लाखांच्या बजेटमध्ये, ज्या २४ kmpl पर्यंत मायलेज देतात

Maruti Celerio ZXI AMT Mileage
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २६.० kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Maruti Celerio ZXI AMT Features
मारुती सेलेरियो ZXI AMT मध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे तर, कंपनीने मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, Android Auto आणि Apple कार प्ले कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स दिली आहेत. समोरची सीट देण्यात आली आहे.