scorecardresearch

Maruti Dzire CNG लवकरच होणार लॉंच; किंमत, फिचर्स आणि मायलेजपर्यंत संपूर्ण डिटेल्स वाचा

मारुती सुझुकीने त्यांच्या सीएनजी कारच्या यादीमध्ये आणखी एक कार समाविष्ट केली आहे ती म्हणजे मारुती डिझायर. मारुतीने या मारुती डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट लॉंच करण्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या डिटेल्स…

Maruti-Dzire-CNG-2
(फोटो-MARUTI)

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या सीएनजी कारच्या यादीमध्ये आणखी एक कार समाविष्ट केली आहे ती म्हणजे मारुती डिझायर. मारुतीने या मारुती डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट लॉंच करण्याची घोषणा केली आहे.
कंपनी मारुती डिझायर सीएनजी दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात आणणार आहे, ज्यात पहिला व्हेरिएंट डिझायर व्हीएक्सआय आणि मारुती डिझायर झेडएक्सआय आहे.


मारुती डिझायरच्या सीएनजी व्हेरिएंटची घोषणा करण्यासोबतच कंपनीने ही कार सबस्क्रिप्शनवर उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे. कंपनी मारुती डिझायर CNG वर ऑफर करत असलेल्या सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी, ग्राहकांना १६,९९९ रुपये प्रारंभिक शुल्क भरावे लागेल. 
मारुती डिझायरच्या सीएनजी व्हेरिएंटच्या लॉंचसह कंपनीच्या सीएनजी कार पोर्टफोलिओमध्ये 9 सीएनजी कार असतील, ज्या आतापर्यंत कोणत्याही कंपनीकडे नाहीत. मारुती डिझायर सीएनजीच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने त्यात 1.2 लीटर इंजिन दिले आहे, जे के सीरीजचे ड्युअल जेट व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन आहे.


हे इंजिन ७७ पीएस पॉवर आणि ९८.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले जाईल. मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ते मारुती डिझायर पेट्रोलवर 23.26 kmpl देते. पण या कारच्या सीएनजी व्हेरिएंटबाबत कंपनीचा दावा आहे की मारुती डिझायर सीएनजी मोडवर ३१.१२ किमी प्रतिलिटर मायलेज देते.


कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक एलईडी लाइट्स, ऑटो फोल्डिंग ORVMS, पुश बटन इंजिन स्टार्ट-स्टॉप, ऑटो एसी, रिअर एसी व्हेंट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह सात इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी फिचर्स आहेत. 

आणखी वाचा : आता फक्त १ लाखात मिळू शकते Royal Enfield Himalayan, जाणून घ्या ऑफर


किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने मारुती डिझायर सीएनजीच्या VXI व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ८.१४ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे.


Maruti Dzire CNG च्या ZXI व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ८.८२ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
मारुती डिझायर सीएनजी लाँच केल्यानंतर ही कार ह्युंदाई ऑरा सीएनजी, टाटा टिगोर सीएनजीला टक्कर देईल हे नक्की.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti dzire cng launched soon know full details from price to features and mileage prp

ताज्या बातम्या