Premium

महिंद्रा थार आणि टाटा पंचसह ‘या’ गाड्यांचा होणार गेम; स्पर्धा करण्यासाठी लवकरच लॉन्च होणार पाच SUV, जाणून घ्या

पुढील काही महिन्यांमध्ये अनेक कंपन्या आपल्या नवीन एसयूव्ही बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहेत.

top 5 suv launch in india soon
आगामी काळामध्ये लॉन्च होणार नवीन आणि अपडेटेड एसयूव्ही (Image Credit-loksatta Graphics Team)

भारतामध्ये सध्या अनेक कंपन्या आपल्या एसयूव्ही लॉन्च करत आहेत. सध्या देशामध्ये एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. एसयूव्ही म्हणजे (स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल). भारतामध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये अनेक कंपन्या आपल्या नवीन एसयूव्ही बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहेत. त्या एसयूव्ही कोणत्या आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मारूती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, किआ इंडिया आणि होंडा कार्स इंडिया यांसारख्या मूळ वाहन उत्पादक कंपन्या आपले नवीन एसयूव्ही मॉडेल किंवा सध्या असलेल्या एसयूव्ही नवीन अपडेटसह लॉन्च करणार आहेत. त्यामध्ये Maruti Suzuki Jimny, Hyundai Exeter, Tata Nexon फेसलिफ्ट, Kia Seltos फेसलिफ्टआणि Honda Elevate यांचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हेही वाचा : Ola, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या

Maruti Suzuki Jimny

मारूती सुझुकी इंडिया जूनच्या पहिल्या आठवड्यात आपली Jimny एसयूव्ही लॉन्च करणार आहे. सुझुकीच्या एसयूव्हीमध्ये Fronx, Brezza आणि Grand Vitara यांचा समावेश आहे. मारूती जिमनी महिंद्रा थारला टक्कर देईल. याची किंमत ११ तर १५ लाख (एक्स शोरूम) रुपये असण्याची शक्यता आहे.

Hyundai Exter

Hyundai कंपनी १० जुलै रोजी आपली Exter एसयूव्ही लॉन्च करणार आहे. या एसयूव्हीचे बुकिंग आधीचपासूनच सुरु झाले आहे. ह्युंदाईच्या या एसयूव्हीची किंमत ६ लाख ते ९.५० (एक्स शोरूम ) लाख इतकी असू शकते. ही गाडी टाटा पंचला टक्कर देईल. Exter हे Hyundai च्या SUV लाईन-अपमधील सर्वात परवडणारे मॉडेल असेल. ज्यामध्ये व्हेन्यू, क्रेटा , अल्काझार आणि टक्सन यांचा समावेश आहे.

Tata Nexon facelift

टाटा Nexon एसयूव्ही देशामध्ये सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही आहे. या एसयूव्हीमध्ये लवकरच एक नवीन प्रमुख अपडेट मिळणार आहे. टेस्टिंग दरम्यान अनेकदा या एसयूव्हीला पाहिले गेले आहे. हे अपडेटेड मॉडेल लवकरच लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. Nexon २०२३ ची किंमत ८ लाख ते १५ लाख (एक्स शोरूम) रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : महिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर

Kia Seltos facelift

किआ इंडिया भारतामध्ये सेलटॉस फेसलिफ्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.याचे नवीन मॉडेल जुलै मध्ये लॉन्च होऊ शकते.Kia Seltos २०२३ ह्युंदाई क्रेटा आणि मारूती सुझुकी ग्रँड विटारा या एसयूव्हीला टक्कर देईल. सध्या बाजारात असलेल्या वाहनाची किंमत १०.८९ लाख ते १९.६५ (एक्स शोरूम ) लाख रुपये आहे.

Honda Elevate

होंडा कार्स इंडिया ६ जून रोजी नवीन Elevate ही मध्यम आकाराची एसयूव्ही लॉन्च करणार आहे.Elevate ही कंपनीची नवीन माध्यम आकाराची एसयूव्ही आहे. या एसयूव्हीचा पुढील महिन्यामध्ये भारतात वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हे मॉडेल जागतिक मॉडेल म्हणून विकसित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 11:01 IST
Next Story
Ola, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या