Maruti Baleno Regal Edition launched : दिवाळीमध्ये अनेक कार कंपन्या ग्राहकांना डिस्काउंट ऑफर्स देत आहे. काही कंपन्या तर नवीन मॉडेल लाँच करत आहे. आता यामध्ये मारुती सुझुकीचे नाव जोडले आहे. कारण मारुती सुझुकीने आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक बलेनोचे एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या मॉडेलला बलेनो रीगल नाव दिले आहे. बलेनो रीगल एडिशन नावाच्या या स्पेशल व्हर्जन मध्ये अनेक प्रकारच्या कॉम्प्लीमेंट्री एक्सेसरीज दिल्या आहेत. आणि हे मॉडेल सर्व व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. (Maruti launched Baleno Regal Edition in diwali check features and price of Baleno Regal)

मारुती बेलेनो रीगलमध्ये नवीन काय आहे? (Maruti Baleno Regal Edition)

मारुती बेलेनो रीगल एडिशनद्वारे बलेनोबरोबर कॉम्प्लीमेंट्री एक्सेसरीजमध्ये फ्रंट अंडरबॉडी स्पॉयलर, रिअर अंडरबॉडी स्पॉयलर, डुअल-टोन सीट कवर, 3डी मॅट, साइड मोल्डिंग, मड फ्लॅप, 3डी बूट मॅट, ग्रिल आणि रिअरसाठी क्रोम गार्निश, स्टीयरिंग कव्हर, फॉग लँप, वॅक्यूम क्लिनर, बॉडी कव्हर, नेक्सा कुशन, डोर वायजर, सिल गार्ड, रिअर पार्सल ट्रे, विंडो कर्टेन, टायर इन्फ्लेटर, लोगो प्रोजेक्टर लँप आणि क्रोम डोर हँडलचा सहभाग आहे. या पॅकेजची किंमत व्हेरिअंटच्या आधारावर ४५,८२९ रुपयांपासून ६०,१९९ रुपयांपर्यंत आहे पण आता हे मोफत उपलब्ध आहे.

Chhath Puja 2024 Date Time Significance in Marathi
Chhath Puja 2024: छठ पूजा का साजरी केली जाते? जाणून घ्या या चार दिवसांच्या सणाचे महत्त्व
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Wriddhiman Saha Announces Retirement on social Media Said That He Will Retire After The Ranji Trophy 2024 Season
टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्तीची केली घोषणा, ‘या’ टूर्नामेंटनंतर क्रिकेटला करणार अलविदा
Loksatta vyaktivedh Bibek Debroy English translation of 18 Puran
व्यक्तिवेध: बिबेक देबरॉय
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?

हेही वाचा : Mahindra Diwali Sale : दिवाळीपूर्वी महिंद्राने केले ग्राहकांना खूश! ‘या’ SUV वर दिला तगडा डिस्काउंट; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिक वर

Maruti Baleno Regal Edition: पावरट्रेन

मारुती बलेनो एक प्रीमियम हॅचबॅक आहे ज्यामध्ये १.२ लीटरचे सिलेंडरचा नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 90hp च्या पावर आणि ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. ट्रान्शमिशन पर्यांयामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT चा सहभाग आहे. मारुती डेल्टा आणि जेटा व्हेरिअंटबरोबर पर्यायामध्ये CNG किट सुद्धा दिले आहे.

हेही वाचा : Suzuki Gixxer offers : आणखी काय हवं? १० वर्षांची वॉरंटी, तर २० हजार रुपयांपर्यंत…; सुझुकीची बेस्ट डील

Maruti Baleno Regal Edition: किंमत

मारुति बलेनोची सुरुवातीची किंमत ६.६६ लाख रुपये आहे जी टॉप मॉडलमध्ये गेल्यानंतर 9.83 लाख रुपये (एक्स-शोरूम) होते. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये बलेनोची थेट स्पर्धा ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोज बरोबर होते.