Maruti S Presso Loan Down Payment EMI Details: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा मार्केटमध्ये चांगलाच दबदबा आहे, त्यामुळे या कंपनीच्या कारना बाजारात चांगली मागणी आहे. मारुती सुझुकी ही प्रत्येक सेगमेंटमध्ये कार तयार करते. आता काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या ‘Maruti S Presso’ या मायक्रो एसयूव्ही कारवर जबरदस्त सवलत मिळत आहे. मारुती एस्प्रेसोचे बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) ४,२५,००० रुपये इतकी आहे. पण ही कार तुम्हाला फक्त ४० हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. आम्ही तुम्हाला या कारवरील फायनान्स प्लॅनची माहिती देणार आहोत. या प्लॅनद्वारे तुम्ही ही कार फक्त ४०,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करू शकता. जाणून घेऊया फायनान्स प्लॅन.

Maruti S Presso फायनान्स प्लॅन
Maruti S Presso आता ही कार अवघ्या ४०,००० रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येणार असून यासाठी तुम्हाला ही एसयूव्ही कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी करण्यासाठी ६.६४ लाख रुपये मोजावे लागतील परंतु, तुम्ही प्लॅनद्वारे ४० हजार रुपये भरून ती खरेदी करू शकता. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्ही ४०,००० रुपये भरून कर्जासाठी अर्ज अप्लाय करू शकता. तर तुम्हाला बँक ४,२४,७९२ रुपयांचे कर्ज देईल.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
Cancer Treatment
कर्करोगावर उपचार १०० रुपयांत, या गोळीचे फायदे काय? टाटा इनस्टिट्युटच्या डॉक्टरांचा दावा काय?

कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या कारसाठी ४० हजार रुपये डाउन पेमेंटसाठी जमा करावे लागतील. परंतु हे लक्षात ठेवा, हे कर्ज ९.८ टक्के व्याजदराने दिलं जाईल. तुम्हाला ५ वर्षांसाठी हे कर्ज मिळेल. त्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ८,९८४ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

(आणखी वाचा : मस्तच! तरुणांना वेड लावणारी ‘ही’ जबरदस्त क्रूझर बाईक फक्त २ हजारात बुक करा; फीचर्समध्ये आहे टाॅपवर, जाणून घ्या बाईकची खासियत)

Maruti S Presso ‘अशी’ आहे खास
नवीन S-Presso CNG १.० ड्युअल जेट इंजिन ५५०० rpm वर ६६ Bhp पॉवर आणि ३५०० rpm वर ८९Nm टॉर्क जनरेट करते. असं असलं तर CNG वर चालत असताना पॉवर 56.59 bhp आणि टॉर्क 82.1 Nm पर्यंत खाली येते. पेट्रोल मॉडेलसाठी ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्सच्या पर्यायासह ५-स्पीड मॅन्युअल देखील उपलब्ध आहे. तर CNG प्रकारासाठी फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, सीएनजी प्रकार ३२.७३ किमी/किलो सीएनजी मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी S-Presso मध्ये Apple CarPlay, Android Auto, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो आणि कीलेस एंट्रीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी फीचर्स आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत, कार ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट, EBD-ABS आणि फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर सारख्या फीचर्ससह येते.