Best Car Under 10 Lakh: येत्या नव्या वर्षांत कार घेण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला दहा लाख रुपयांच्या बजेटमध्ये अधिक मायलेज आणि दमदार फीचर्ससह लाँच होणाऱ्या गाड्यांची माहिती देणार आहोत. पाहा संपूर्ण यादी.

‘या’ गाड्या खरेदी करता येणार दहा लाख रुपयांच्या आत

  • मारुती सुझुकी बलेनो क्रॉस

मारुती सुझुकी लवकरच भारतीय वाहन बाजारात बलेनो या प्रीमियम हॅचबॅक कारचं अपडेटेड मॉडेल लाँच करणार आहे. ही कंपनी बलेनो क्रॉस ही नवीन कार लाँच करणार आहे. कंपनी ही कार त्यांच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित करत आहे. ही कॉम्पॅक्ट कार बीएस-६ कम्प्लायंट बूस्टरजेट टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज कार आहे. कंपनी या कारमध्ये माईल्ड हायब्रिड इंजिन देखील देऊ शकते. नुकतीच ही SUV चाचणी दरम्यान दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही कार ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये लाँच करू शकते.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Who is Landmark Group CEO Renuka Jagtiani
एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
92 crores recovered from the implementation of Mumbai Maharera orders
मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतून ९२ कोटींची वसुली

(आणखी वाचा : Cheapest Electric Car: ‘स्वस्त आणि मस्त’ इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करताय? मग १० लाखांहून कमी किंमतीत खरेदी करा ‘या’ इलेक्ट्रिक कार)

  • महिंद्रा इलेक्ट्रिक KUV100

ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा जानेवारी २०२३ मध्ये मायक्रो SUV महिंद्रा इलेक्ट्रिक KUV100 लाँच करू शकते. या कारमध्ये १५.९kWh क्षमतेचे लिक्विडकुल्ड बॅटरीपॅक असलेले BLDC इलेक्ट्रिक मोटर असू शकते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जर १५० ते १७५ किलोमीटर पर्यंत धावू शकते. कंपनी ही इलेक्ट्रिक कार दहा लाखापर्यंत लाँच करू शकते. पण कंपनीकडून अद्याप या इलेक्ट्रिक कारच्या किमतीबद्दल कुठलीही माहिती मिळालेली नाही.

  • स्कोडा फोबिया २०२३

स्कोडा फोबिया २०२३ ही कार अपडेटेड डिझाईन, फीचर आणि स्पेसिफिकेशन सह बाजारात लाँच होऊ शकते. डिझाइनच्या बाबतीत ही हॅचबॅक कार खूपच प्रेक्षणीय आहे. कंपनी ही कार अपडेटेड फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर करेल. ही कार दोन इंजिन पर्याय सह बाजारात उपलब्ध होऊ शकते. कंपनीची ही कार दहा लाखापर्यंत बाजारामध्ये सादर केली जाऊ शकते. मात्र, कंपनीकडून या कारच्या किमतीबद्दल कुठली माहिती मिळालेली नाही.