scorecardresearch

दरमहिना भरा फक्त १२ हजार अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ८ लाखांची ‘ही’ कार

तुमची आवडती मारुतीची ‘ही’ दमदार कार आता इतक्या स्वस्तात आणता येणार घरी.

maruti suzuki baleno delta finance plan
मारुती सुझुकी बलेनो डेल्टा (image credit – financial express)

 कार सेक्टरमध्ये मोठ्या संख्येने प्रीमियम हॅचबॅक कार आहेत आणि या प्रीमियम हॅचबॅक त्यांच्या स्टायलिश डिझाइन आणि त्यांच्या किमतीच्या टॅगशिवाय वैशिष्ट्यांमुळे पसंत केल्या जातात. ज्यामध्ये आम्ही मारुती सुझुकी बलेनोबद्दल बोलत आहोत, जी आपल्या किंमती, डिझाइन वैशिष्ट्ये आणि मायलेजमुळे बाजारात मजबूत पकड राखत आहे. मारुती सुझुकी बलेनो Delta ही फेब्रुवारी २०२३ ची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील बनली आहे. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी बलेनो Delta फायनान्स प्लॅनद्वारे स्वस्तात कसे खरेदी करता यईल, याविषयी माहिती देणार आहोत.

मारुती सुझुकी बलेनो डेल्टा व्हेरिएंटच्या किमती ७,४०,००० रुपये (एक्स-शोरूम) दिल्लीपासून सुरू होते आणि ८,४०,०७५ रुपयांपर्यंत जाते.

हेही वाचा : IPL 2023: आयपीएलदरम्यान प्रत्येक मैदानात Tata ची ‘ही’ कार मिरवणार, बनली अधिकृत भागीदार

जर का तुमच्याजवळ या गाडीला खरेदी करण्यासाठी इतके मोठे बजेट नाही आहे. तर खाली दिलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही या प्रीमियम हॅचबॅकला ७० हजार रुपये देऊन खरेदी करू शकता. ऑनलाईन फायनान्स प्लॅनचे डिटेल सांगणाऱ्या कॅल्क्युलेटरनुसार बँक या कारची ७,७०,००० रुपयांचे कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँक तुम्हाला ९.८ टक्के व्याज आकारेल.

मारुती सुझुकी बलेनो डेल्टा (image credit – financial express)

Maruti Suzuki Baleno Delta डाउन पेमेंट आणि EMI

मारुती सुझुकी बलेनो डेल्टा मॉडेलवर कर्ज मंजूर झाले की तुम्हाला ७० हजार रुपये इतके डाऊन पेमेंट भरावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला १२,२८६ रुपये असे पाच वर्षे हप्ते भरावे लागतील.

महत्वाची टीप : वर दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी खरेदी करत असताना पूर्ण चौकशी करूनच कोणताही आर्थिक व्यवहार करावा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 15:40 IST

संबंधित बातम्या