Best Car In India: तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण देशात सर्वाधिक पसंतीस उतरेलेल्या एका कारची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या कारने भारतीय बाजारपेठेत आपला डंका वाजवला आहे. ही कार खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. तुमचाही कार घेण्याचा विचार असेल तर तुम्ही या कारचा विचार करु शकता. चला तर जाणून घ्या कोणती आहे ही दमदार कार.

या’ कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन ‘बलेनो’ भारतात (maruti suzuki baleno 2022) लाँच केली. ही कार मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने जेव्हा पहिल्यांदा ही कार लाँच केली होती, त्यावेळी लाँच होताच ही कार कंपनीच्या टॉप सेलिंग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली होती. या कारने कंपनीची लोकप्रिय कार स्विफ्टलाही विक्रीत मागे सोडले होते. आता Maruti Suzuki baleno या प्रीमियम हॅचबॅक कारची नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक विक्री झाली आहे.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा

(हे ही वाचा : ‘या’ १५ कार खरेदीवर मिळवा घसघशीत डिस्काउंट; पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?)

Maruti Suzuki Baleno ची ‘इतक्या’ युनिट्सची विक्री

गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात २०,९४५ युनिट्सच्या विक्रीसह, Maruti Suzuki Baleno ने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार विभागात अव्वल स्थान पटकावले आहे, एवढेच नाही तर बलेनो ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार देखील ठरली आहे. Hyundai i20 ने २,२३६ युनिट्स विकल्या आहेत तर Tata Altroz ने ५,०८४ युनिट्सची विक्री केली आहे.

Maruti Suzuki Baleno ‘अशी’ आहे खास

कंपनीने यात १.२ लिटर इंजिनसोबतच DualJet तंत्रज्ञानासह सिंगल पेट्रोल इंजिन पर्याय दिला आहे. हे चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन ९०bhp पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅण्डर्ड आहे. यात एक AMT गिअरबॉक्स देखील आहे. जे मागील बलेनोच्या CVT ऑटोमॅटिकची जागा घेतो. अनेक फीचर्स असूनही टॉप-एंड बलेनो ही सर्वात स्वस्त कार आहे.