Maruti Suzuki Car Discount July 2022: ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या कोणती कार घेणं फायदेशीर ठरेल?

ऑटो सेक्टरमध्ये कार कंपन्यांनी एकीकडे त्यांच्या कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे आणि कारच्या रेंजवर आकर्षक डिस्काउंट ऑफरही जाहीर केल्या आहेत.

Maruti-Suzuki-Car-Discount
(फोटो- MARUTI SUZUKI)

ऑटो सेक्टरमध्ये कार कंपन्यांनी एकीकडे त्यांच्या कारच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे आणि दुसरीकडे त्यांच्या सध्याच्या कारच्या रेंजवर आकर्षक डिस्काउंट ऑफरही जाहीर केल्या आहेत. या एपिसोडमध्ये रेनॉल्टनंतर आता मारुती सुझुकीचे नाव जोडले गेले आहे, जे त्यांच्या निवडक कारवर सूट देत आहे आणि ही सूट कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक कार ते मायक्रो एसयूव्हीवर दिली जात आहे.

मारुती सुझुकीच्या या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि इतर फायदे दिले जात आहेत, परंतु कंपनीने जारी केलेली ही सवलत फक्त पेट्रोल इंजिन असलेल्या कारवरच मिळणार आहे.

मारुती सुझुकीची ही सवलत ऑफर ३१ जुलैपर्यंत वैध आहे. परंतु ग्राहकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन कंपनी पुढे वाढवू शकते.

जर तुम्ही देखील मारुती सुझुकी कार घेण्याचा विचार करत असाल तर येथे जाणून घ्या कोणती मारुती कार खरेदी केल्याने तुम्हाला किती फायदा होणार आहे.

Maruti Alto 800: मारुती अल्टो ८०० च्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर कंपनीकडून स्वतंत्रपणे एकूण ३१ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये मारुती अल्टोच्या बेस मॉडेलवर ११ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. ज्यामध्ये ५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट सूट आणि ६ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

आणखी वाचा : अर्ध्या किमतीत खरेदी करा Royal Enfield Himalayan, वाचा ऑफर

बेस व्हेरिएंट व्यतिरिक्त, कंपनी इतर व्हेरिएंटवर ३१ हजार रुपयांची सूट देत आहे, ज्यामध्ये १० हजार रुपयांची ग्राहक ऑफर, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाईल.

आणखी वाचा : एका चार्जमध्ये ८५ किमीची रेंज आणि २५ किमी प्रतितास असा टॉप स्पीड, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या

Maruti Swift: मारुती स्विफ्ट ही या कंपनाची लोकप्रिय हॅचबॅक आहे, जी त्याच्या स्पोर्टी डिझाइनसाठी पसंत केली जाते. कंपनी मारुती स्विफ्टच्या LXI, V, Z आणि AGS व्हेरिएंटवर ३२ हजार रुपयांची सूट देत आहे. या सवलतीमध्ये १५ हजार रुपयांचा ग्राहक लाभ, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ७ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

Maruti WagonR: मारुती वॅगनआर ही जुलै महिन्यात देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे, ज्यावर कंपनी एकूण ५१ हजार रुपयांची सूट देत आहे. या सवलतीमध्ये ग्राहकाला ३० हजार रुपयांचा फायदा, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ६ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Maruti Celerio: मारुती सेलेरियोबद्दल कंपनीचा दावा आहे की ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी कार आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर कंपनी त्यावर ५१ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनी या कारच्या LXI, VXI आणि AGS वर ५१ हजार रूपयांची सूट देत आहे. ज्यामध्ये ३० हजार रुपयांची ग्राहक ऑफर, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

Maruti S Presso: मारुती एस्प्रेसो ही त्यांच्या कंपनीची एकमेव मायक्रो एसयूव्ही आहे ज्यामध्ये कंपनी पेट्रोल आणि एजीएस व्हेरिएंटवर ३१ हजार रुपयांची सूट देत आहे. यामध्ये ग्राहकांना १५ हजार रुपयांचा लाभ, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ६ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.

मारुती सुझुकीने दिलेली ही डिस्काउंट ऑफर राज्यानुसार बदलू शकते, त्यामुळे कोणतेही वाहन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या मारुती डीलरशिपला भेट देऊन या सवलतीची संपूर्ण माहिती मिळवावी.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti suzuki car discount july 2022 benefit on buying alto 800 swift wagonr celerios presso cars read full details prp

Next Story
एका चार्जमध्ये ८५ किमीची रेंज आणि २५ किमी प्रतितास असा टॉप स्पीड, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी