Highest-selling cars of the year : भारतात सध्या सात सीटर सेगमेंटच्या कारांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. मोठ्या कुटुंबासाठी ही गाडी एक चांगला पर्याय आहे. ऑगस्ट, २०२४ मध्ये सात सीटर सेगमेंट कार विक्रीमध्ये मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) अव्वल क्रमांकावर आहे. मीडिया रिपोर्टनुसार मारुती सुझुकीने मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये एकुण १८,५८० युनिट कार्सची विक्री केली होती आणि मागील वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये मारुती सुझुकी अर्टिगाने एकुण १२, ३५ युनिटची विक्री केली होती. यावरून तुमच्या लक्षात येईल की मारुती सुझुकी अर्टिगाच्या विक्रीमध्ये तब्बल ५१ टक्केची वाढ झाली आहे. आज आपण सर्वात जास्त विक्री झालेल्या कार्सविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सच्या या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio). महिंद्रा स्कॉर्पिओच्या विक्रीमध्ये वर्षभरात ३९ टक्के वाढ झाली आहे. महिंद्रा स्कॉर्पिओने १३,७८७ युनिट कार्सची विक्री केली आहे.

विक्रीच्या या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर टोयोटा इनोव्हा (Toyota Innova)कार आहे. टोयोटा इनोव्हाच्या विक्रीमध्ये १२ टक्के वाढ झाली आहे आणि टोयोटा इनोव्हाने एकुण ९,६८७ युनिट कार्सची विक्री केली आहे.

याशिवाय या विक्रीच्या चौथ्या स्थानावर आहे महिंद्रा XUV 700 (Mahindra XUV700 ). महिंद्रा XUV 700 ची मागच्या महिन्यात ३८ टक्के विक्रीमध्ये वाढ दिसून आली. विक्रीबरोबर महिंद्रा XUV 700 ने ९,००७ युनिट कार्सची विक्री केली आहे.

हेही वाचा : Maruti Swift CNG vs Tata Tiago CNG: कोणती हॅचबॅक कार आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही…

सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार्सच्या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावार महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) आहे. महिंद्रा बोलेरोच्या विक्रीमध्ये २९ टक्के वार्षिक घट झाली आहे. महिंद्रा बोलेरोने वर्षभरात ६,४९४ कार्सची विक्री केली आहे.

विक्रीच्या या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे कॅरेन्स (Kia Carens). कॅरेन्सच्या विक्रीमध्ये या कालावधीत ३५ टक्के वाढ झाली असून कॅरेन्सने ५,८८१ युनिटची विक्री केली आहे.

याशिवाय विक्रीच्या या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर मारुती सुझुकी XL6 (Maruti Suzuki XL6) आहे. मारुती सुझुकी XL6ची यादरम्यान ३५ टक्के वार्षिक घट झाली असून फक्त २,७४० युनिटची विक्री केली आहे.

विक्रीच्या या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर टोयोटा फॉर्च्यूनर (Toyota Fortuner)आहे. टोयोटा फॉर्च्यूनरच्या विक्रीमध्ये या १७ टक्के वार्षिक घट झाली आहे. २, ३३८ युनिट कारची विक्री केली आहे.

याशिवाय नवव्या स्थानावर विक्रीच्या या लिस्टमध्ये टाटा सफारी (Tata Safari) आहे. टाटा सफारीची ९१ टक्के वार्षिक वाढ झाली असून एकुण १,९५१ युनिट कार्सची विक्री केली आहे.

दहाव्या स्थानावर या लिस्टमध्ये रेनॉल्ट ट्रायबर आहे. रेनॉल्ट ट्रायबर(Renault TRIBER) च्या विक्रीमध्ये १७ टक्के वार्षिक घट झाली असून एकुण १,५१४ युनिट कारची विक्री केली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki ertiga seven seater car have high demand of people check the list of highest selling car in a year ndj
Show comments