Maruti Suzuki’s First EV : आगामी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये मारुती सुझुकी ई-विटारा (e Vitara) लाँच करण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा लाँच करून इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) जगात पाऊल ठेवणार आहे. ई-विटारा कार भविष्यात अधिक परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत विकली जाणारी ईव्ही ठरणार आहे.

ऑटोकार इंडियाच्या मते, मारुती ई-विटारा (e Vitara) एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक हॅचबॅकवर काम करते आहे जी, २०२८ पर्यंत मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. व्हाय २ व्ही Y2V अंतर्गत कोडनेम असलेली ही इव्ही ईडब्ल्यूएक्स (eWX) या संकल्पनेवर आधारित असणार आहे, ज्याचे पेटंट मारुती सुझुकीने २०१२ मध्ये भारतात दाखल केले होते.

Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?
navi mumbai municipal administration once again started activities to set up charging stations at 124 places in the city
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ

मारुती सुझुकी इलेक्ट्रिक हॅचबॅकमध्ये काय खास असेल?

Y2V स्थानिक पातळीवर मारुतीद्वारे विकसित केली जाईल आणि किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि एंट्री-लेव्हल ईव्ही मार्केटची पूर्तता करेल. सध्या १० लाख रुपयांच्या खाली (एक्स-शोरूम) किमतीचे फक्त दोन प्रमुख बॅटरीवर चालणारे मॉडेल मार्केटमध्ये आहेत. त्यातील एक म्हणजे Tata Tiago EV आणि दुसरी म्हणजे MG Comet EV. त्यामुळे मारुती सुझुकी ही रेंज लक्षात ठेवून त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक ई-विटारा (e Vitara) ची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.

बॅटरी :

ऑटोकार इंडियाच्या मते, Y2V कदाचित 35kWh बॅटरीसह येईल. पण, या क्षणी ई-विटारा (e Vitara) मॉडेलबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. या इलेक्ट्रिक हॅचबॅकचे व्यावसायिक उत्पादन बाजारातील मागणी, आर्थिक परिस्थिती आणि किमती, कार्यक्षमतेचे मूल्यमापन यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Y2V हॅचबॅक हा मारुती सुझुकीच्या EV विस्तार योजनेचा एक भाग आहे, जिथे कंपनी फायनान्शिल इयर २०३१ पर्यंत सहा EV बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या अखेरीस EVs चा वाटा एकूण १५ टक्के असेल अशी मारुती सुझुकीने अपेक्षा ठेवली आहे. मारुतीने बॅटरीवर चालणाऱ्या इव्हीची योजना आखण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कंपनी WagonR ची इलेक्ट्रिक आवृत्ती मार्केटमध्ये घेऊन येणार होती. तसेच काही वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये हीच संकल्पना प्रदर्शित करण्यात आली होती. वॅगनआर ईव्हीची चाचणीसुद्धा झाली होती, पण प्रकल्पाच्या अव्यवहार्यतेमुळे मारुतीला प्रकल्प पूर्णपणे थांबवावा लागला. पण, आता आगामी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Story img Loader