Maruti Suzuki Car Price Hike: देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) पुन्हा एकदा आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच जानेवारी २०२३ पासून मारुती आपल्या सर्व सर्व मॉडेल्स कारच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एकूणच चलनवाढीमुळे वाढलेल्या खर्चाच्या दबावामुळे या किमती वाढवाव्या लागत असल्याचं मारुतीचं म्हणणं आहे.

किमती वाढविण्याचं कारण काय ?

adani electricity Increase fuel surcharge for may
अदानीची वीज महागली; मे महिन्यापासून इंधन अधिभारात वाढ
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

एकूण महागाई आणि अलीकडील नियामक आवश्यकतांमुळे कंपनीने वाढलेल्या किमती, सोबतच कंपनी खर्च कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून आणि या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी किंमती वाढवून काही प्रभावांना पार करणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळेच कंपनीने जानेवारी २०२३ मध्ये किंमत वाढवण्याची योजना आखली असल्याचं सांगण्यात आलं आहे. किंमती या मॉडेल्स अनुसार वेगवेगळ्या असणार आहेत. मात्र, कंपनीने प्रस्तावित दरवाढीचे प्रमाण जाहीर केले नाही.

(आणखी वाचा : नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री; ‘ही’ कार कंपनी ठरली देशात अव्वल! )

या वर्षी म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीला, मारुती सुझुकी इंडियाने वैयक्तिक इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे हॅचबॅक स्विफ्ट आणि सर्व CNG प्रकारांच्या किमतींमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या (एक्स-शोरूम दिल्ली) किमतीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली होती.

कंपनीकडून जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान सर्व वाहनांच्या किमती ८.८ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या होत्या. सुटे भाग आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाली असल्याचे कंपनीने सांगितले होते.

नोव्‍हेंबर २०२२ च्‍या महिन्‍याच्‍या विक्रीचे आकडे जाहीर करताना, ऑटोमेकरने सांगितले की, तिची एकूण विक्री १४.४ टक्‍क्‍यांनी वर्षानुवर्षे वाढून १.५९ लाख युनिट इतकी झाली असून ती मागील आर्थिक वर्षातील याच महिन्‍यात १.३९ लाख युनिट इतकी होती.