Maruti Suzuki: भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. तगडं मायलेज देता यावं यासाठी वाहन कंपन्या आता हायब्रिड कारवर लक्ष केंद्रीत करत आहेत. तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला एक उत्तम मायलेज देणारी कार हवी असेल तर तुम्ही हायब्रिड कारचा पर्याय निवडू शकता. देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी येत्या वर्षात तीन नवीन हायब्रीड कार लाँच करण्याची तयारी करत आहे. या कारमुळे ग्राहकांना जास्त मायलेज मिळणार आहे. चला तर जाणून घ्या पुढील एका वर्षात कंपनी ग्राहकांसाठी कोणत्या कोणत्या कार्स लाँच करू शकते.

‘ह्या’ जबरदस्त मायलेजवाल्या कार होणार लाँच

Maruti Swift Hybrid
नवीन जनरेशनची सुझुकी स्विफ्ट टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. हे टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा पाहिले गेले आहे. फीचर्स आणि पॉवरट्रेनच्या बाबतीत ही कार अपग्रेड केले गेले आहे. नवीन स्विफ्ट स्ट्राँग हायब्रीड टेक्नॉलॉजीसह सादर केली जाऊ शकते. नवीन २०२४ मारुती सुझुकी स्विफ्टला टोयोटाच्या मजबूत हायब्रिड टेक्नॉलॉजीसह नवीन १.२-लिटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन असू शकते. या अपडेटमुळे स्विफ्ट देशातील सर्वात जास्त फ्यूल एफिशिएंट कार बनणार आहे. स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेनसह स्विफ्ट हॅचबॅक जवळपास ३५-४०kmpl (ARAI प्रमाणित) मायलेज देऊ शकते.

Change your morning habits will help in achieving success
Morning Habits For Success: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बदला तुमच्या सकाळी उठल्यानंतरच्या या सवयी
abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
prabhas-london-house
‘या’ कारणासाठी आता प्रभास राहणार लंडनमध्ये भाड्याच्या घरात; भाड्याची रक्कम ऐकून व्हाल चकित
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल

(आणखी वाचा : Maruti Suzuki: भारतातच नव्हे तर विदेशातही मारुतीच्या ‘या’ कारने वाजवला डंका, यामागचं कारण माहितेय का?)

Maruti Dzire Hybrid
मारुती सुझुकी आपल्या अतिशय लोकप्रिय कारचे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे. यामध्ये मारुती डिझायर कॉम्पॅक्ट सेडानचा समावेश आहे. मारुती सुझुकी डिझायर ही त्याच्या सेगमेंटमधील पहिली कार असेल जी मजबूत हायब्रिडसह येईल. ही कार नवीन १.२L पेट्रोल इंजिन ३ सिलेंडर सेटअपसह येईल. या मोटरमध्ये टोयोटाची स्ट्राँग हायब्रिड टेक वापरण्यात येणार आहे. मजबूत हायब्रिड प्रणालीसह नवीन स्विफ्ट आणि डिझायर भारतातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार बनतील. मारुती डिझायर हायब्रीड २०२३ च्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते.

New Maruti MPV
टोयोटा-सुझुकी दरम्यान चालू असलेल्या मॉडेल-शेअरिंग भागीदारीचा भाग म्हणून टोयोटा आपली नवीन इनोव्हा हायक्रॉस मारुती सुझुकीला देईल. मारुती सुझुकी स्वतःच्या नेमप्लेटसह लॉन्च करेल पण त्याआधी त्यात काही बदल केले जातील. मारुतीचे हायक्रॉस मॉडेल देखील भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसले आहे. ही हायक्रॉसवर आधारित नवीन मारुती एमपीव्ही ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर केली जाऊ शकते.