Maruti Swift Hybrid Car and Maruti Dzire Hybrid Car: देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून देशात मारुती सुझुकीचा डंका आहे. Maruti Dzire आणि Maruti Swift या कंपनीच्या लोकप्रिय कार आहेत. अनेक दिवसांपासून Maruti Dzire आणि Maruti Swift बाबत कोणतेही मोठे अपडेट्स दिसले नाहीत. मारुती कंपनीच्या या दोन गाड्यांना खूप मागणी आहे. बऱ्याच काळापासून ते अपडेट न केल्यामुळे,ते हायब्रिड आवृत्तीमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानामुळे, या दोन्ही कार सुमारे ४० किमी मायलेज देऊ शकतात. कंपनी पुढील वर्षी म्हणजेच २०२४ पर्यंत या कार लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Swift Next Generation मॉडेलचे मायलेज

मारुती कंपनी २०२४ च्या पहिल्या सहामाहीत मारुती स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करू शकते. यात १.२ लीटर मजबूत हायब्रिड इंजिन पाहायला मिळेल. याला कंपनीने Z12E कोडनेम दिले आहे. सध्या ही कार K12C कोडनेमसह उपलब्ध आहे. कारबद्दल जाणून घेतल्यास, लोकांचा असा विश्वास आहे की, हायब्रिड इंजिन फक्त टॉप व्हेरियंटमध्येच दिसेल. सध्या, मारुतीच्या ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरमध्ये ही वैशिष्ट्ये आधीपासूनच उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Maruti Suzuki Nexa कडून २० लाखांपेक्षा अधिक वाहनांची विक्री; ‘या’ गाड्यांना सर्वाधिक पसंती

Maruti Swift – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या विकतात, कारण…

सुझुकी आणि टोयोटा दोघेही त्यांचे तंत्रज्ञान एकमेकांशी शेअर करतात. म्हणजेच, या दोन्ही कंपन्यांच्या कारमध्ये तुम्हाला समान वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. ही तंत्रे Hyride आणि Grand Vitara मध्ये दिसतात. या दोन्ही कार २७.९७ kmpl चा मायलेज देतात. काही लोक असाही अंदाज लावत आहेत की, स्विफ्ट आणि डिझायर कमी वजनाव्यतिरिक्त मजबूत हायब्रिड आणि लहान आकारामुळे सुमारे ३५-४० Kmpl मायलेज देऊ शकतात. याबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Maruti Dzire- संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Maruti Dzire आणि Maruti Swift किंमत

मारुती डिझायर आणि मारुती स्विफ्ट अपडेट केल्यानंतर या दोन्ही कारच्या किमतीत किंचित वाढ होऊ शकते. पण मारुती कंपनीच्या बहुतांश गाड्या कमी किमतीत आणि उत्तम वैशिष्ट्यांमुळेच विकल्या जातात. हे लक्षात घेता, या दोन्ही कारची किंमत अंदाजे ९.४० लाख रुपयांपेक्षा कमी असेल. मारुती स्विफ्ट बद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवातीची किंमत ५.९९-८.९८ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, डिझायरची किंमत ६.४४ लाख रुपयांपासून सुरू होऊन ९.३१ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki launch swift and dzire in hybrid model 40 km mileage know about price and features tmb 01
First published on: 26-03-2023 at 08:55 IST