Maruti Suzuki Nexa Discount : ऑटोमोबाइल क्षेत्रात कार निर्मित कंपन्या जून महिन्यात कारमध्ये डिस्काउंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात देशातील सर्वात मोठी कार निर्माण कंपनी मारुती सुजुकी जी त्याच्या नेक्सा रेंजद्वारे विक्री केल्या जाणाऱ्या कारांवर आकर्षक डिस्काउंट ऑफर देत आहेत . मारुती ज्या कारांवर डिस्काउंट देत आहेत त्यामध्ये बलोनो,फ्रोंक्स, जिम्नी, सियाज, XL6 आणि ग्रँड विटारा सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.

मारुती सुजुकी नेक्सा कार डिस्काउंटमध्ये कंपनीच्या सवलतीशिवाय एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि अन्य फायदे देते. हा कार डिस्काउंट ३० जून पर्यंत असेल जो स्टॉक किती उपलब्ध आहे, यावर अवलंबून असणार. जर तुम्ही नवीन मारुती सुजुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिस्काउंटविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara)

मारुती सुझुकीच्या फ्लॅगशिप एसयूव्ही ग्रँड विटारा यावेळी नेक्सा रेंजमध्ये सर्वात जास्त डिस्काउंट ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये २० हजार रुपये सूट, ५० हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट डीलचा समावेश असेल. मारुति सुझुकीने स्टँडर्ड दोन वर्ष वॉरन्टी वाढवून पाच वर्षांपर्यंत केली आहे. स्टँडर्ड पेट्रोल संचालित ग्रँड विटारा पोर्टफोलिओ ३४ हजार रुपयांपासून ६४ रुपयांपर्यंतच्या सूटबरोबर सीएनजी मॉडेलवर केवळ ४ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहेत.

मारुती सुझुकी फ्रोंक्स (Maruti Suzuki Fronx)

फ्रोंक्स संपूर्ण मारुती सुजुकी पोर्टफोलिओमध्ये सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही पैकी एक आहे आणि नेक्साची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही आहे. एप्रिल २०२४ मध्ये महिन्यात फ्रोंक्सची १४, २८६ युनिट विक्री झाली होती. फ्रोंक्स एकमेव अशी मारुती सुजुकी आहे जी दोन इंजिनमध्ये सादर केली आहे. एस्पिरेडेट इंजिन आणि टर्बो पेट्रोल.

टर्बो पेट्रोल फ्रोंक्सवर ५७,००० रुपयांपर्यंत ऑफर आहेत. ज्यामध्ये १५ हजार रुपयांची सवलत, १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डीलचा समावेश आहे. या शिवाय ३०,००० रुपये वेलोसिटी एक्सेसरीज किट सुद्धा या डिस्काउंटबरोबर येतात. दुसरे म्हणजे नॅचरली एस्पिरेटेड फ्रोंक्सवर २७ हजार रुपयांपर्यंत सवलत उपलब्ध आहे आणि सीएनजी मॉडेलवर जवळपास १२,००० रुपये सवलत मिळते.

हेही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ; Bajaj ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल, १२३ किमीची ड्रायव्हिंग रेंज, किंमत…

मारुती सुझुकी जिम्नी (Maruti Suzuki Jimny)

जिन्मी या एसयूव्हीवर ऑफ रोडिंगची आवड असणारे उत्साही लोक मारुती सुजुकी देत असलेल्या सवलतीवर लक्ष ठेवून असतात. जिम्नी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण यावर या महिनाभर ५० हजार रुपयांची सवलतीची ऑफर आहे. जिम्नी च्या दिल्ली एक्स शोरुम किंमत १२.७४ लाख रुपयांपासून सुरू होत असून १४.७९ लाख रुपयांपर्यंत आहे. एसयूव्ही १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन द्वारा चालते ज्याचा आउटपुट, १०३ बीएचपी आणि १३४.२ एनएम टॉर्क आहे जो दोन ट्रान्समिशन पर्यायसह उपलब्ध आहे. एक ५ स्पीड मॅन्युअल आहे तर दुसरी ४ स्पीड मॅन्युअल आहे.

मारुती सुझुकी इग्निस (Maruti Suzuki Ignis)

इग्निस एएमटी मॉडेलवर ५८,००० रुपयांची सवलत दिली जात आहे. यामध्ये ४०,००० रुपयांची सवलत, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस समाविष्ट आहे. इग्निस मॅन्युअल रेंजवर ५३ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

मारुती सुझुकी बलोनो (Maruti Suzuki Baleno)

बलोनो मारुती सुजुरी नेक्साची सर्वात बेस्ट सेलर कार आहे. प्रीमियम हॅचबॅकच्या एएमटी मॉडेलवर ५७,००० रुपयांची सूट आहे. ज्यामध्ये ३५,००० रुपयांची सवलत, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि २ हजार रुपयांचा कॉर्पोरेड डील चा समावेश आहे. फ्रोंक्स मॅन्युअल ट्रिम्सवर ५२ हजार रुपयांपर्यंत सवलत देतो आणि सीएनजी मॉडेलवर ३२ हजार रुपयांची सवलत देतो. या हॅचबॅकची किंमत ८.३८ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सियाज ( Maruti Suzuki Ciaz)

मारुती सुझुकी सियाज सर्वाधिक महागडी कार आहे. नेक्सा सियाज च्या सर्व व्हेरिअंट्सवर ४८ हजार पर्यंत सवलत देत आहे. या डीलमध्ये २० हजार रुपयांची सवलत, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि ३ हजार रुपयांची कॉर्पोरेट सवलत देत आहे. सियाजची दिल्ली एक्स शोरूम किंमत ९.४० लाख रुपयांपासून १२.२९ लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी XL6 (Maruti Suzuki Ciaz)

मारुती सुझुकी XL6 वर एकुण ३० हजार रुपयांची सवलत देत आहे. पेट्रोल व्हेरिंएटवर एक डील मिळते ज्यामध्ये २० हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि १० हजार रुपयांची सवलत आहे. XL6 सीएजीवर १० हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर मिळू शकतो. XL6 ची किंमत ११.६१ लाख रुपयांपासून १४.६१ लाख रुपयांपर्यंत आहे