Maruti Suzuki Baleno Price Cut: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या ‘मारुती सुझुकी इंडिया’ने, एप्रिल २०२६ मध्ये आपल्या ‘नेक्सा’ (Nexa) श्रेणीतील कार्सवर २.१५ लाख रुपयांपर्यंतच्या सवलती देऊ केल्या आहेत. ज्या कार्सवर सवलती देण्यात आले आहेत, त्यामध्ये मारुती सुझुकी इग्निस, मारुती सुझुकी बलेनो, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स, मारुती सुझुकी जिम्नी, मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा, मारुती सुझुकी एक्सएल६ आणि मारुती सुझुकी इन्व्हिक्टो यांचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मारुती सुझुकीने केलेल्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सवलती सादर करण्यात आल्या आहेत. या वर्षात कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांच्या विक्रीचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. यामध्ये एकूण १८,२३,१२९ वाहनांची विक्री झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत (y-o-y) ३.५४ टक्क्यांनी अधिक होती.

मारुती सुझुकी आपली नवीन वाहने ‘नेक्सा’ आणि ‘अरिना’ या दोन शोरूमच्या माध्यमांतून विकते. अरिना मॉडेल्सच्या तुलनेत नेक्सा मॉडेल्स अधिक प्रीमियम आहेत. अरिना मॉडेल्समध्ये अल्टो के१०, एस-प्रेसो, सेलेरियो, वॅगन-आर, इको, स्विफ्ट, डिझायर, अर्टिगा, ब्रेझा, आणि व्हिक्टोरिस यांचा समावेश होतो.

मॉडेल एकूण सवलती (पर्यंत)
मारुती सुझुकी इग्निस रु. ५०,०००
मारुती सुझुकी बलेनो रु. ४०,०००
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स रु. ५५,०००
मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा रु. १.०७ लाख
मारुती सुझुकी जिम्नीरु. ५०,०००
मारुती सुझुकी XL6 रु. ५०,०००
मारुती सुझुकी इन्विक्टोरु. २.१५ लाख

या एकूण सवलतींमध्ये ग्राहक ऑफर, विशेष डीलर ऑफर, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस (जिथे लागू असेल तिथे), लॉयल्टी अपग्रेड बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर यांसारख्या सवलतींचा समावेश आहे.

नेक्सा मॉडेल्समध्ये, इग्निस हॅचबॅकवर ५०,००० रुपयांपर्यंत, बलेनो हॅचबॅकवर ४०,००० रुपयांपर्यंत, फ्रॉन्क्स एसयूव्हीवर ५५,००० रुपयांपर्यंत, ग्रँड विटारा एसयूव्हीवर १.०७ लाख रुपयांपर्यंत, जिम्नी एसयूव्हीवर ५०,००० रुपयांपर्यंत, XL6 MPV वर ५०,००० रुपयांपर्यंत आणि Invicto MPV वर २.१५ लाख रुपयांपर्यंतच्या एकूण ऑफर्स उपलब्ध आहेत.

सवलत कधीपर्यंत?

या सवलती मारुती सुझुकीच्या ‘नेक्सा’ कार्सवर या महिन्याच्या अखेरपर्यंत लागू आहेत. तसेच, प्रत्येक मॉडेलच्या व्हेरिएंटनुसार (प्रकारानुसार) या सवलतींमध्ये फरक असू शकतो. याव्यतिरिक्त, मारुती सुझुकी एप्रिल महिन्यात आपल्या ‘अरेना’ मॉडेल्सवरही ४५,००० रुपयांपर्यंतच्या सवलती देत आहे.