Maruti Suzuki Nexa कडून २० लाखांपेक्षा अधिक वाहनांची विक्री; ‘या’ गाड्यांना सर्वाधिक पसंती

मारुती नेक्सा रिटेलमार्फत Baleno, Ignis, Ciaz, XL6 आणि Grand Vitara सारख्या मॉडेल्सची विक्री करते.

maruti nexa sales 20 lakh cars in 8 years
Maruti Suzuki Nexa – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Maruti Suzuki ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असते. आता या कंपनीच्या नेक्सा रिटेल चेनबद्दल एक माहिती समोर आली आहे. मारुतीने प्रीमियम वाहनांची विक्री करणार्‍या Nexa रिटेल २० लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मारुती नेक्सा रिटेलमार्फत Baleno, Ignis, Ciaz, XL6 आणि Grand Vitara सारख्या मॉडेल्सची विक्री करते. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रँक्स आणि जिमनी या आगामी SUV ची देखील या चेनद्वारे विक्री केली जाणार आहे. मारुती सुझुकीच्या प्रीमियम डीलरशिप चेन असणारी नेक्सा सध्या देशातील २८० शहरांमध्ये ४४० ठिकाणी पसरलेली आहे. याशिवाय मारुती नेक्सचाचे विक्रीचे प्रमाण २०१५ मध्ये पाच टक्क्यांवर होते ते आता २०२२-२०२३ मध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे.

हेही वाचा : BMW Motorrad: भारतात लॉन्च झाली R 18 Transcontinental बाईक, SUV सारखे पॉवरफुल इंजिन आणि…

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी (सेल्स अँड मार्केटिंग )अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले, “आम्ही नेक्साचा २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पहिले १० लाख चार वर्षांतआले, तर पुढील १० लाख वाहनांची विक्री तीन वर्षात झाली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या Nexa हा या ऑटो उद्योगातील चौथ्या क्रमाकांचा ब्रँड आहे. पुढील वर्षापर्यंत Nexa या उद्योगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड होईल. या वर्षीच्या मारुतीच्या एकूण विक्रीमध्ये नेक्साचा २३ टक्के वाटा आहे. यामध्ये सुमारे ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. श्रीवास्तव म्हणाले, नेक्साचा देशांतर्गत प्रवासी वाहन उद्योगात बाजारातील भागीदारी १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

तसेच मारुतीला अशी अपेक्षा आहे नेक्सा रिटेल आऊटलेटद्वारे विकल्या जाणाऱ्या प्रीमियम व्हॅनची विक्री २०२३ पर्यंत Hyundai आणि Tata Motors च्या एकत्रिक विक्रीपेक्षा जास्त असेल. मारुती सुझुकी इंडियाने बीएस VI स्टेज 2 नियमांनुसार एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 10:51 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 25 March: आज पेट्रोल-डिझेल महागलं, खिशाला कात्री; वाचा तुमच्या शहरातले नवे भाव
Exit mobile version