Maruti to explore supplies of Jimny to Indian armed forces: भारतीय लष्कर मारुती जिप्सी दीर्घकाळापासून वापरत आहेत. त्यांच्या ताफ्यात अनेक जिप्सी आहेत. आता भारतीय लष्करही मारुती जिमनी आपल्या ताफ्यासाठी घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, भारतीय लष्कराने जिमनीमध्ये आपली रुची दाखवली आहे. कंपनी सध्या आर्मी-स्पेक जिमनीसाठी आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

याचा अर्थ जिमनी सैन्यासाठी सज्ज व्हावी, यासाठी काही बदल केले जातील. सहसा, सैन्याच्या बहुतेक वाहनांमध्ये सॉफ्ट टॉप असतो, त्यामुळे जेव्हा जिमनी सैन्यासाठी तयार असेल तेव्हा त्याला सॉफ्ट टॉप देखील दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, सस्पेंशन आणि पॉवरट्रेन देखील विशेषतः ट्यून केले जाऊ शकतात.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

(हे ही वाचा: टाटाचा मोठा धमाका! देशात दाखल केली दोन CNG सिलिंडर असलेली कार, किंमत उघड, बुटस्पेसही जबरदस्त )

मारुतीने दोन दशकांत भारतीय लष्कराला जिप्सीच्या ३५,००० हून अधिक युनिट्स विकल्या आहेत. हे सॉफ्ट टॉप, फुल ओपन आणि अगदी हार्ड टॉपसह विकले गेले. ऑलिव्ह ग्रीन कलरची जिप्सी २०२० पर्यंत लष्कराला देण्यात आली होती. आता जिमनी सैन्यात जिप्सीची जागा घेऊ शकते.

सध्या, मारुती जिमनी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १.५-लीटर पेट्रोल इंजिन (१०५PS) द्वारे समर्थित आहे. ५-door मारुती जिमनी सुझुकीच्या ऑलग्रिप प्रो ड्राईव्हट्रेन सिस्टीमसह कमी-गुणोत्तर ट्रान्सफर केससह येते. हे तीन ड्राइव्ह मोडसह येते, यात 2H, 4H आणि 4L चा समावेश आहे.

SUV मध्ये ३६ अंशांचा अप्रोच एंगल, ५० डिग्रीचा डिपार्चर एंगल आणि २४ डिग्रीचा रॅम्प ओव्हर अँगल आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी हेडलॅम्प, ९-इंच टचस्क्रीन सिस्टम, क्रूझ कंट्रोल, मागील पार्किंग कॅमेरा आणि सहा एअरबॅग्ज आहेत. याचे ग्राउंड क्लीयरन्स २१०mm आहे आणि ते खूपच हलके आहे.