देशात मारुती सुझुकी आपल्या आकाराने लहान गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच त्यांची लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Vitara Brezza वेगळे करून Brezza आणि Grand Vitara या दोन SUV लाँच केल्या आहेत. पण मारुती विटारा ब्रेझाची क्रेझ आजही बाजारात कायम आहे. कंपनीने या कारचे उत्पादन बंद केले आहे परंतु ही SUV अजूनही मोठ्या प्रमाणात बाजारात आहे.

तुम्हाला हे Maruti Vitara Brezza आवडत असल्यास किंवा त्याचे सेकंड हँड मॉडेल विकत घ्यायचे असल्यास चांगली डील शोधत असाल, तर या SUV वर उपलब्ध असलेल्या आजच्या सर्वोत्तम ऑफरचे तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत ही कार घेऊ शकाल. मारुती विटारा ब्रेझाच्या सेकंड हँड मॉडेलवर मिळणाऱ्या या ऑफर्स वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेतल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या सर्वोत्तम ऑफर्सची माहिती मिळेल.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
dhule police corruption marathi news
दोन लाख रुपये देत असेल तर हद्दपारी रद्द…धुळ्यात पोलिसांची गुन्हेगाराकडेच पैशांची मागणी

(हे ही वाचा : नया है यह! ‘Hyundai Aura’ आता नव्या अवतारात, पाहताच क्षणी पडाल प्रेमात, पाहा किंमत अन् फीचर्स )

Second Hand Maruti Vitara Brezza

मारुती विटारा ब्रेझा सेकंड हँड मिळवण्याचा आॅफर MARUTI SUZUKI TRUE VALUE वर आहे. जिथे या SUV चे २०१८ चे मॉडेल विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. या एसयूव्हीची नोंदणी उत्तर प्रदेशची असून तिची किंमत ५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही SUV खरेदी केल्यास तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी, तीन मोफत सेवा आणि फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

Used Maruti Vitara Brezza

वापरलेल्या Maruti Vitara Brezza वर आणखी एक स्वस्त डील CARWALE वेबसाइटवर उपलब्ध आहे ज्यामध्ये दिल्ली नंबर प्लेट असलेल्या SUV च्या २०१८ मॉडेलची सूची आहे. या SUV साठी ५.५ लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून त्यासोबत फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

(हे ही वाचा : मोठ्या कुटुंबांची ६ लाखाची ‘ही’ आवडती कार १ लाखात घरी आणा, केवळ ‘इतका’ भरा EMI )

Maruti Vitara Brezza Second Hand

मारुती विटारा ब्रेझा सेकंड हँड मॉडेलवरील तिसरी सर्वात स्वस्त डील OLX च्या कार विभागात उपलब्ध आहे. दिल्ली नोंदणीसह मारुती विटारा ब्रेझा ची २०१८ मॉडेल यादी येथे आहे. या कारची किंमत ५.८९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV सोबत विक्रेत्याकडून कोणतीही फायनान्स योजना किंवा इतर ऑफर दिली जाणार नाही.