देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने २०२२ मध्ये त्यांच्या अनेक लोकप्रिय कारच्या अपडेटेड आणि फेसलिफ्ट आवृत्त्या लाँच केल्या आहेत. यात Celerio, WagonR, Baleno सारख्या हॅचबॅकपासून ते Maruti Ertiga आणि XL6 सारख्या एमपीव्ही आहेत. आता कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Vitara Brezza चा फेसलिफ्ट अवतार लाँच करणार आहे. मारुती सुझुकी विटारा ब्रेझाचे फेसलिफ्ट नुकतेच चाचणी दरम्यान दिसले होते. त्यानंतर आता कंपनीने गुरुग्राममधील मानेसर प्लांटमध्ये या नवीन एसयूव्हीचे उत्पादन सुरू केल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मारुती सुझुकी विटारा ब्रेझा जागतिक स्तरावर सादर करेल आणि ती मेच्या पहिल्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते.

कंपनीने नविन विटारा ब्रेझा सध्याच्या विटारा ब्रेझापेक्षा अधिक आकर्षक आणि डिझाइनमध्ये तयार केली आहे. याच्या पुढील बाजूस नवीन डिझाइन केलेले क्रोम ग्रिल, नवीन डिझाइन केलेले फ्रंट बंपर, फॉग लाइट्स आणि नवीन डिझाइन बंपर, नवीन डिझाइन टेल लाइट आणि मागील बाजूस एक बॅज देण्यात आला आहे. सध्याच्या विटारा ब्रेझामध्ये, कंपनीने १.५ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे १०५ पीएस पॉवर आणि १३८ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड एटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. मारुती विटारा ब्रेझा फेसलिफ्टमध्ये कंपनी या कारचे इंजिन बदलून दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय देऊ शकते. यामध्ये पहिले इंजिन १.५ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड आणि दुसरे इंजिन १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते. ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्स या दोन्ही इंजिनांसह पर्याय केला जाऊ शकतो.

Jeep Meridian सात सीटर एसयूव्हीचे बुकिंग ‘या’ तारखेपासून, जाणून घ्या फिचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी सध्याच्या कारमध्ये दिलेली ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तिच्या फेसलिफ्ट आवृत्तीमध्ये ९ इंचांपर्यंत वाढवू शकते. याशिवाय ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, अँटी-लॉक बेकिंग सिस्टम, ईबीडी आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स अपडेट करताना कंपनी हेड अप डिस्प्ले, ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये जोडू शकते. मारुती सुझुकीने या विटारा ब्रेझा फेसलिफ्टच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु तज्ञांच्या मते, कंपनी ८.१५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह हा नवीन फेसलिफ्ट Vitara Brezza बाजारात लाँच करू शकते. लाँच झाल्यानंतर, ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही Hyundai Venue, Kia Sonet आणि Renault Kyger यांच्याशी थेट स्पर्धा करेल.