Second Hand Maruti Wagon R Offers : मारुती सुजुकीजवळ कारांची खूप मोठी रेंज आहे ज्यामध्ये हॅचबॅकपासून एसयुव्हीपर्यंत सर्व कार्सची लिस्ट आहे आणि या सर्व गाड्या मार्केटमध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहे. अशातच मारुती सुझुकीची Wagon R कार मध्यमवर्गीय लोकांमध्ये किंमतीमुळे आणि चांगल्या मायलेजमुळे खूप लोकप्रिय आहे. ही गाडी मागील कित्येक वर्षांपासून कंपनीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे.

मारुती Wagon R ची किंमत

मारुती सुझुकी Wagon R ची किंमत सुरुवातीला ४. ५४ लाख रुपये आहे. पण जर ही कार टॉप मॉडेलमध्ये गेली तर याची किंमत ७.३८ लाख रुपये होऊ शकते. जर तुम्हाला ही कार आवडली असेल किंवा खरेदी करायची असेल आणि बजेटमुळे खरेदी करू शकत नाही तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता Wagon R कारचा तुम्ही सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता. या सेकंड हँड मॉडेलवर मिळणारे ऑफर्सविषयी जाणून घ्या. या ऑफरमध्ये तुम्हाला ही कार अर्ध्यापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळू शकते.

हेही वाचा : Best Budget Cars: ८ लाखांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ ३ सीएनजी कार, देतील जबरदस्त मायलेज; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

जाणून घ्या ऑफर

  • सेकंड हँड मारुती Wagon R वर मिळणारा पहिला ऑफर ओएलएक्स वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे Wagon R चा २०१२ चा मॉडेलची विक्री सुरू आहे ज्याचे रेजिस्ट्रेशन दिल्ली येथील आहे. या कारमध्ये आफ्टर मार्केट सीएनजी किट लावली आहे. कारची किंमत फक्त दीड लाख रूपये आहेत.
  • Wagon R मारुतीवर मिळणारी दुसरी स्वस्त डील ही QUIKR वेबसाइटवर आहे जिथे या कारचा २०१३ चा मॉडेल उपलब्ध आहे. या कारची मालकी सेकंड आहे ज्याचे रेजिस्ट्रेशन दिल्ली येथील आहे. या गाडीची किंमत २.३ लाख रुपये आहेत त्याचबरोबर फायनान्स प्लॅन सुद्धा आहे.
  • मारुती Wagon R सेकंड हँड मॉडेलची स्वस्त डिल तुम्ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू या वेबसाइटवरून करू शकता. या वेबसाइटवर मारुती Wagon R ची २०२१४ चा मॉडेलची विक्री सुरू आहे. या कारची किंमत ३ लाख रुपये आहेत आणि त्याचबरोबर सहा महिन्याच्या इंजिनची वॉरन्टी आहे तसेच फायनान्स प्लॅनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

सूचना : मारुती सुझुकी Wagon R च्या सेकंड हँड मॉडेल्सवर मिळणारे हे ऑफर्स ऑनलाइन सेकंड हँड कार खरेदी, विक्री आणि लिस्टींग करणाऱ्या कंपन्याकडून आहेत. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि नंतर व्यव्हार करा.