Maruti Suzuki ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन वाहने लॉन्च करत असते. तसेच ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या अनेक वाहनांचे लॉन्चिंग केले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक विक्री होणारी कंपनी बनली असून कंपनीच्या ७ कार टॉप १० मध्ये आहेत. जर तुम्हीसुद्धा मारुती सुझुकी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण कंपनीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ कार बद्दल जाणून घेऊयात. ज्या फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वात जास्त विकल्या गेल्या आहेत.

Maruti Suzuki Alto

मारुती सुझुकी Alto ही तिसऱ्या क्रमांकाची कार आहे ज्याची सर्वाधिक विक्री फेब्रुवारी २०२३ महिन्यात झाली आहे. ही कार एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. मारुतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये कारच्या ११,५५१ युनिट्सची विक्री केली होती. तर या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुतीनी अल्टो कारची १८,११४ युनिट्सची विक्री केली आहे. एका वर्षात मारुती अल्टोच्या विक्रीमध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मारुती सुझुकी अल्टो दोन इंजिन पर्यायांमध्ये विकली जाते. एक इंजिन हे ८०० सीसीचे आणि दुसरे हे थोडे मोठे म्हणजे १.० कीतीर्चे के सिरीज इंजिन यामध्ये येते.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…

हेही वाचा : Honda New Bikes: होंडा कंपनीने लॉन्च केल्या ‘या’ दोन जबरदस्त बाईक्स, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift ही फेब्रुवारी २०२३ मधील सर्वाधिक विक्री होणारी दुसऱ्या क्रमांकाची कार आहे. स्विफ्ट कार आपल्या स्पोर्टी डिझाईन आणि मायलेजसाठी ओळखली जाते. मारुती सुझुकी स्विफ्टने फेब्रुवारी २०२२ मध्ये १९,२०२ युनिट्सची विक्री केली होती. तर २०२३ फेब्रुवारी मध्ये स्विफ्ट कारने १८,४१२ युनिट्सची विक्री केली आहे. यंदा स्विफ्टच्या विक्रीमध्ये घट झाली असली तरी ही कार सर्वाधिक विक्रीच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.मारुती सुझुकी स्विफ्ट हे असे मॉडेल आहे की , जयने मारुती सुझुकीच्या लाइनअपमध्ये खूप कालावधीपासून अपग्रेडेशन पहिले नाही आहे. कंपनीने जर का हे मॉडेल १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले तर ही चार भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार असेल.

Maruti Suzuki Baleno – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

Maruti Suzuki Baleno

Maruti Suzuki Baleno ही फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विकली जाणारी पहिल्या क्रमांकाची कार आहे. Baleno या मॉडलमध्ये गेल्या वर्ष एक मोठे टेक अपडेट करण्यात आले होते. मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात बलेनोच्या १८,५९२ युनिट्सची विक्री केली त्यामध्ये ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मारुती सुझुकी बलेनो काही बदलांसह टोयोटा ग्लान्झा म्हणून विकली जाते आणि प्रीमियम हॅचबॅक विभागात Hyundai i20 आणि Tata Altroz ​​शी स्पर्धा करते.