Maserati Grecale SUV Launched In India : जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी वाहन निर्मिती करणारी कंपनी Maserati ने आपली नवीन SUV Grecale भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. तीन वेगळ्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या एसयूव्हीची किंमत १.३१ कोटी रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते. Maserati Grecale SUV लाँच Maserati ने भारतात लक्झरी SUV Grecale ही तीन व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे, ज्यामध्ये GT, Modena आणि Trofeo यांचा समावेश आहे. लवकरच या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील कंपनी लाँच करू शकते. २१ स्पीकर आणि ADAS सारखे दमदार फीचर्स या एसयूव्हीमध्ये एकापेक्षा एक असे दमदार फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. लक्झरी SUV मधील फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि बरोबर 8.8 इंची स्क्रीन, कार्बन फायबर, ॲल्युमिनियम इन्सर्ट, 1200 वॅट्सच्या २१ स्पीकर्ससह 3D साउंड सिस्टम, लेव्हल- 1 ADAS, 58AS लिटर बूट स्पेस, एअर सस्पेंशन, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे. दोन इंजिनचा पर्याय एसयूव्हीमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. त्याच्या बेस आणि मिड व्हेरियंटमध्ये दोन लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनमधून एसयूव्हीला 300 आणि 330 bhp पॉवर मिळते. SUV च्या टॉप व्हेरियंटमध्ये तीन लिटर क्षमतेचे V6 इंजिन आहे, जे 530 bhp आणि 620 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. ते फक्त 3.8 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. त्याचा टॉप स्पीड 285 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ZF 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सर्व व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे. किंमत १.३१ कोटी रुपयांपासून सुरू Maserati Grecale SUV ची एक्स-शोरूम किंमत 1.31 कोटी रुपयांपासून सुरू होते. ही किंमत त्याच्या GT व्हेरियंटसाठीही सेम आहे. मोडेना व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १.५३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि तिचा टॉप व्हेरिएंट ट्रोफियो २.०५ कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीवर खरेदी केला जाऊ शकतो.