scorecardresearch

Mercedes लवकरच लॉन्च करणार ‘ही’ हायब्रीड कार; दमदार इंजिन, 204hp इलेक्ट्रिक मोटरसह आहेत आकर्षक फीचर्स

Mercedesच्या ‘या’ नव्या गाडी आणि तिच्या लॉन्चशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या..

Mercedes AMG GT 63 S E Performance
मर्सिडीज हायब्रीड कार (फोटो सौजन्य – @Mercedes-AMG twitter)

Mercedes AMG GT 63 S E Performance ही मर्सिडीजद्वारे निर्मित हायब्रीड कार आहे. मर्सिडीज-एएमजीच्या पहिल्या प्लग-इन हायब्रिड गाडीचे मॉडेल ग्राहकांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहे. 4 लीटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन आणि 204hp इलेक्ट्रिक मोटर आहे. या दोन्हींमुळे एकत्रितपणे 843hp आणि 1,400Nm पेक्षा जास्त टॉर्क निर्माण करणे शक्य होते. २.९ सेकंदांमध्ये ही आलिशान गाडी ० ते १०० किमी प्रति तास वेगाने चालवता येते. गाडीची टॉप स्पीड 316kph इतकी आहे. शिवाय या गाडीमध्ये 639hp ची क्षमता देखील आहे. या आलिशान गाडीच्या लॉन्चची घोषणा नुकतीच करण्यात आली.

या गाडीमधील इलेक्ट्रिक मोटर 6.1kWh आणि 400V बॅटरी उपलब्ध आहे. या मोटरचे एकूण वजन ८९ किलो असल्याची माहिती समोर आली आहे. या उत्पादनाच्या निर्मात्यांचा असा दावा आहे की, या PHEV ची इलेक्ट्रिक रेंज 12km आहे. फक्त इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने ती 130kph चा टॉप स्पीड मिळवू शकते. तसेच यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचे चार स्तर देखील उपलब्ध आहेत. ठराविक परिस्थितीमध्ये वन-एक-पेडल-ड्रायव्हिंगचा वापर केला जाऊ शकतो.

Mercedes-AMG GT 63 S E Performance ची वैशिष्ट्ये

या गाडीमध्ये मर्सिडीजच्या स्टॅन्डर्ड गाड्यांच्या तुलनेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. टू-डोर GT, नवीन बॅजिंग, नवीन एक्झॉस्ट आउटलेट्स अशा काही गोष्टींचा त्यात समावेश आहे. PHEV साठी खास नवीन अलॉय व्हील डिझाइन तयार करण्यात आले आहे. गाडीच्या मागच्या बंपरवर फ्लॅप आहे. यामध्ये चार्जिंग पोर्ट आहे. अन्य स्टॅन्डर्ड गाड्या आणि या गाडीच्या टू-डोर GTडिझाइनमध्ये समानता आहे. मर्सिडीजच्या इतर मर्सिडीज PHEV मॉडेल्सप्रमाणे, या गाडीमध्येही MBUX प्रणालीसाठी अनेक हायब्रीड-स्प्रेसिफीक डिस्प्ले जोडण्यात आला आहे. यामध्ये EV रेंज इंडिकेटर, रिअल-टाइम पॉवर वापर डेटा आणि इलेक्ट्रिक मोटर पॉवर गेज यांचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा – डेकॅथलॉनची नवीन ई-सायकल भारतामध्ये लॉन्च; 380 Wh बॅटरी पॅक, 250W मोटरसह अनेक अत्याधुनिक फीचर्स, किंमत आहे…

मर्सिडीज-बेंझ कंपनीद्वारे या वर्षामध्ये काही गाड्या लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यांच्या प्लॅननुसार, Mercedes-AMG GT 63 S E Performance भारतामध्ये ११ एप्रिल २०२३ रोजी लॉन्च केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गाडीच्या किंमतीबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:53 IST

संबंधित बातम्या