आलिशान इंटेरिअर आणि नवनवीन फीचरमुळे मर्सडिज संपूर्ण जगात ओळखली जाते. कारचे लूक पाहूनच चाहते तिच्या प्रेमात पडतात. आपल्याकडेही ही शाही सवारी असावी असे अनेकांचे स्वप्न असते. या कारचे पेट्रोल वर्जन आधीच बाजारात धुमाकूळ घालत आहे. आता कंपनीने इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मर्सडिज इक्यूएस ५८० ४ मॅटिक लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनी ३० सप्टेंबराल ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत मर्सडिजची इलेक्ट्रिक कार ही दुसऱ्या देशांतून आयात केली जात होती. मात्र, आता ही कार भारतातच असेंबल झाली आहे. त्यामुळे लाँच नंतर कारची किंमतही कमी असण्याची शक्यता आहे. Mercedes Benz EQS 580 4 Matic ही सिडान कार असून त्यात सर्व प्रकारचे लक्झरी फीचर मिळणार आहेत. या कारला मर्सडिजच्या इलेक्ट्रिक व्हेइकल आर्किटेक्चरवर बनवण्यात आले आहे.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

(रीअर सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांची कारवाई; इतक्या रुपयांचा ठोठावला दंड)

कसे असणार डिजाईन?

कारला समोरून क्लोज्ड आणि ब्लॅक आउट ग्रील देण्यात आली आहे ज्यामुळे ती इलेक्ट्रिक कार असल्याचे समजते. तेसच कारला शार्प एलइडी हेडलँप देण्यात आले आहेत जे तिला स्पोर्टी लूक देतात. कारला फ्रेमलेस दारे आहेत, फ्लश डोअर हँडल आणि १९ इंचचे अलॉय व्हिल देण्यात आले आहेत.

इतके मायलेज देणार

इक्यूएस ५८० ला ड्युअल मोटर सेटअप आहे. ही कार ५१६ बीएचपीची पावर आणि ८५६ एनएमचा टॉर्क निर्माण करते. ही कार १०७.८ किलोवॉट हवर्स लिथियम आयन बॅटरी पॅकसह उपलब्ध होणार आहे. कार एकदा चार्ज केल्यावर ७७० किमी पर्यतची रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे. महाराष्ट्रातील पुण्याजवळील चाकण येथे असलेल्या मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या कारखाण्यात हे वाहन असेंबल होणार आहे.

(ऑफ रोड ड्राइव्हर्ससाठी आनंदाची बातमी, हार्लेच्या ‘या’ अ‍ॅडव्हेंचर बाइकवर मिळत आहे ४ लाखांची भरघोस सूट)

कारची किंमत काय?

इक्यूएस ५८० च्या किंमतीबाबत ३० सप्टेंबरला माहिती मिळणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १.८० कोटींपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. ही कार ऑडी इट्रोन जीटी आणि पोर्श तेकान या वाहनांना आव्हान देणार आहे.