लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारपेठेत आपली पुढची आणि चौथी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. कंपनीने आज शुक्रवारी Mercedes-Benz EQE इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओमधली ही चौथी कार आहे. ही कार थेट BMW iX, Jaguar i-Pace आणि नुकत्याच लाँच झालेल्या Audi Q8 e-tron शी स्पर्धा करेल.

सध्या ही जर्मन कंपनी भारतीय बाजारात EQS आणि EQB इलेक्ट्रिक वाहने विकते. या नवीन मर्सिडीज-बेंझ EQE इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश असेल. ही कार कंपनीच्या EVA (इलेक्ट्रिक व्हेईकल आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्मवर आधारित असून या कारची सेडान कारही जागतिक स्तरावर उपलब्ध आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

(हे ही वाचा : Mahindra पाहतच राहिली, टाटाची Nexon EV नव्या अवतारात कमी किमतीत देशात दाखल, मिळतील हायटेक फीचर्स )

Mercedes-Benz EQE SUV कशी आहे खास?

नवीन Mercedes-Benz EQE इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक पॉवरट्रेन आणि बॅटरी पर्याय असतील. या कारच्या बेस व्हेरिएंट, EQE 350+ मध्ये सिंगल मोटर, रियर व्हील ड्राइव्ह सेटअप आहे, जो २८८ bhp पॉवर आणि ५६५ NM चा पीक टॉर्क जनरेट करतो. ही कार एका चार्जवर ५९० किलोमीटरची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

सर्व प्रकारांमध्ये ९०.६ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. तर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) 4MATIC प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, DC फास्ट चार्जिंग EQE मध्ये उपलब्ध आहे, जे १७० kW चार्जिंग स्पीड देते. या कारमध्ये ब्रँडची लोकप्रिय MBUX हायपरस्क्रीन आणि १२.३ इंच टचस्क्रीन पॅनल आहे. समोरच्या प्रवाशाला या टचस्क्रीनचा फायदा मिळतो.

Mercedes-Benz EQE SUV किंमत

कंपनीने या कारची किंमत १.३९ कोटी रुपये ठेवली आहे. ही सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आहे.

Story img Loader